Bihar Election 2025: तेजस्वी यादव की नितीश कुमार..; काय असतील Exit Pollचे अंदाज?
Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी (6 नोव्हेंबर) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. यानंतर बिहारमध्ये २०२५ मध्ये कोण जिंकणार? असा सवाल उपस्थित होत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील १२१ जागांसाठी मतदान झाले, ज्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी पूर्ण ताकद लावली.त्यानंतर राज्यासह देशभरात बिहारच्या एक्झिट पोलचे अंदाज काय असतील याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते, एनडीए आणि महाआघाडीमधील लढाई अत्यंत अटीतटीची असल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्नात आहेत. तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगत आहे. याशिवाय राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्ष, तेज प्रताप यादव यांचा जनशक्ती जनता दल आणि ओवेसींचा एआयएमआयएम हे पक्षही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ज्यामुळे ही लढाई त्रिकोणीय बनली आहे.
Bihar Elections 2025: बिहारच्या मोकामामध्ये मतदानावेळी उफाळला
मतदान सुरू असताना, बिहारमधील लोक कोणत्या दिशेने जात आहेत याबद्दल जनतेची उत्सुकता वाढत आहे. पण, निवडणूक आयोगाने (ECI) मतदान पूर्ण होण्यापूर्वी कोणतेही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते ११ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:३० दरम्यान कोणत्याही मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्झिट पोल किंवा त्यांचे निकाल प्रदर्शित करणे हा फौजदारी गुन्हा आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्ही होऊ शकतात.
Bihar Election 2025 voting : बिहार विधानसभा निवडणुकीचा
निवडणूक आयोगाने असाही पुनरुच्चार केला आहे की निवडणूक प्रचार संपल्यानंतर ४८ तासांपर्यंत कोणत्याही प्रकारच्या प्रचारावर पूर्णपणे बंदी असेल. या कालावधीत या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही उमेदवाराला किंवा पक्षाला कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
दरम्यान, राज्यातील १८ जिल्ह्यांमधील १२१ विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले, एकूण ३७.५ दशलक्षाहून अधिक मतदारांनी मतदान केले. बिहारमध्ये पहिल्यांदाच, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, फिलीपिन्स, बेल्जियम आणि कोलंबिया या सहा देशांतील १६ प्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम (IEVP) अंतर्गत निवडणूक प्रक्रियेचे निरीक्षण केले. प्रतिनिधींनी बिहार निवडणुकांचे कौतुक केले आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात सुव्यवस्थित, पारदर्शक, कार्यक्षम आणि सहभागी निवडणुकांपैकी एक म्हटले.
बुधवारी रात्री, मतदानाच्या पूर्वसंध्येला, ४००,००० हून अधिक मतदान कर्मचारी रात्री ११:२० वाजेपर्यंत त्यांच्या मतदान केंद्रांवर पोहोचले होते. १,३१४ उमेदवारांनी नियुक्त केलेल्या ६७,९०२ हून अधिक मतदान एजंटांच्या उपस्थितीत आज सकाळी ७ वाजण्यापूर्वी मॉक पोल पूर्ण झाले आणि सर्व ४५,३४१ मतदान केंद्रांवर एकाच वेळी शांततेत मतदान सुरू झाले.






