पंजाबमधुन (Punjab) एक मोठी बातमी समोर येत आहे. पंजाबमधील अमृतसर (Amritsar ) येथे सलग दुसऱ्या दिवशी स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. अमृतसर येथील हेरिटेज स्ट्रीट परिसरात आज पुन्हा एकदा स्फोट झाला आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही हानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही. याआधी शनिवारी रात्री अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या (Golden Temple) पार्किंगमध्ये स्फोट झाला होता. शनिवारच्या स्फोटात आयईडीचा (IED) वापर झाल्याचा पोलिसांना संशय आहे. आज झालेल्या स्फोटात कोणतीही हानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नाही.
[read_also content=”सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा फटका; मागणीतही घट, ग्राहकांची दागिने खरेदीकडे पाठ https://www.navarashtra.com/india/hit-by-rising-gold-prices-decline-in-demand-also-consumers-turn-back-to-buying-jewellery-nrps-396194.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरमधील हेरिटेज स्ट्रीटसमोरील सारागढी सराईजवळ आज सकाळी साडेसहा वाजता हा स्फोट (Blast) झाला. हेरिटेज पार्किंग लॉटमध्ये स्फोटक (बॉम्ब) टांगण्यात आले होते आणि तिथेच हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक एफएसएल पथकाने घटनास्थळी पोहोचून नमुने गोळा केले आहेत.
ही पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाचा आवाज खूप मोठा होता आणि त्यानंतर धूर निघताना लोकांनी पाहिले. अमृतसरचे एडीसीपी मेहताब सिंग यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळ झालेल्या स्फोटाच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, ‘आम्ही तपास करत आहोत. येथे परिस्थिती सामान्य आहे. बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल पथके येथे पोहोचली आहेत. एका व्यक्तीच्या पायाला किरकोळ जखमा झाल्या आहेत.
याआधीही शनिवारी संध्याकाळी पंजाबच्या अमृतसरमध्ये भीषण स्फोट झाला होता. अमृतसरमधील सुवर्ण मंदिराजवळील हेरिटेज स्ट्रीटजवळ असलेल्या मिठाईच्या दुकानात असलेल्या चिमणीमुळे स्फोट झाला, त्यानंतर तेथील उपस्थितांमध्ये एकच पळापळ सुरू झाली. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून सुवर्ण मंदिर अवघ्या 1 किमी अंतरावर आहे. स्फोटाची तीव्रता एवढी होती की भाविकांच्या अंगावर खडे पडले आणि काही घरांच्या खिडक्यांच्या काचाही तुटल्या.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी झालेल्या स्फोटात हे स्फोटक धातूच्या केसमध्ये ठेवण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक धातूचे तुकडे जप्त केले आहेत. चिमणीत पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा वापर करून आयईडीद्वारे हा स्फोट झाल्याचा संशय आहे.
मात्र, रेस्टॉरंटच्या चिमणीच्या स्फोटामुळे हा स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एवढेच नाही तर संपूर्ण परिसर सीलही करण्यात आलेला नाही, तसेच परिसर झाकल्यानंतर मार्किंगही करण्यात आले नाही. स्फोटाच्या ठिकाणी पोलिसांसह सर्वसामान्य नागरिकांच्या चपलांच्या खुणांमुळे स्फोटात वापरण्यात आलेल्या रसायनाचे नमुने घेण्यातही फॉरेन्सिक टीमला अडचणीचा सामना करावा लागला.