Instagram Update: प्रायव्हसीवर मिळणार कंट्रोल! क्रिंज 'Close Friends' लिस्टमधून होणार सुटका, नवं फीचर ठरणार यूजर्ससाठी गेमचेंजर
लवकरच हे फीचर सर्व युजरसाठी जारी केलं जाणार आहे. हे फीचर रिलीज करण्यात आल्यानंतर युजर स्वतः ठरवू शकणार आहेत की त्यांना कोणत्या क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये राहायचे आहेत आणि कोणत्या लिस्टमधून बाहेर पडायचे आहे. इंस्टाग्रामने यूजर्ससाठी 2018 साली क्लोज फ्रेंड लिस्ट नावाचे एक फीचर सुरू रिलीज केले होते. या फीचरअंतर्गत युजर्स त्यांच्या स्टोरी आणि रिल्स, पोस्ट काही ठराविक लोकांपर्यंत शेअर करू शकतात. जर तुम्हाला कोणी त्यांच्या क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये जोडले असेल तर तुम्ही त्या लिस्टमधून स्वतः बाहेर येऊ शकत नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
मात्र आता असं होणार नाही. इंस्टाग्रामच्या नव्या फीचरमुळे युजर्सना एखाद्या क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये राहायचं नसेल तर त्यांना क्लोज फ्रेंड लिस्टमधून बाहेर पडण्याचा ऑप्शन मिळणार आहे. असे केल्याने युजर्स समोरच्या व्यक्तीच्या प्रायव्हेट स्टोरी आणि रिल्स पाहू शकणार नाही. तसेच जोपर्यंत समोरची व्यक्ती तुम्हाला पुन्हा क्लोज फ्रेंड लिस्टमध्ये ऍड करत नाही तुम्ही त्या लिस्टमध्ये स्वतः जोडले जाऊ शकणार नाहीत. याचा अर्थ युजर्स ना केवळ एखाद्या क्लोज फ्रेंड लिस्टमधून बाहेर पडण्याचा पर्याय मिळणार आहे. मात्र पुन्हा त्या लिस्टमध्ये सहभागी होण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ही प्रक्रिया करावी लागणार आहे.
या आगामी फीचरची माहिती रिवर्स इंजीनियर Alessandro Paluzzi यांनी दिली आहे. त्यांनी सांगितलं आहे की, इंस्टाग्राम काही नवीन सबस्क्रीप्शन आधारित टूल्सवर काम करत आहे. यामध्ये अनलिमिटेड ऑडियन्स लिस्ट तयार करण्याची सुविधा, तुम्हाला कोणी फॉलो बॅक केलं नाही हे पाहण्याचा पर्याय आणि समोरच्या यूजरला न समजता त्याच्या स्टोरीज पाहणे, अशा फीचरचा समावेश असणार आहे. खास गोष्ट अशी आहे की, स्नॅपचॅट आधीपासूनच असे फीचर्स ऑफर करतो. आता इंस्टाग्राम यूजर्सना देखील हे फीचर्स वापरण्याची संधी मिळणार आहे.






