बृजभूषण यांनी अत्याचारासंबंधी सर्व आरोप फेटाळले; म्हणाले, ‘अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो…’

महिला कुस्तीपटूंकडून लावण्यात आलेले आरोप भाजपा खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह (Brij Bhushan Singh) यांनी फेटाळून लावले आहेत. ज्यावेळी पीडितेवर अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो, असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.

    नवी दिल्ली : महिला कुस्तीपटूंकडून लावण्यात आलेले आरोप भाजपा खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह (Brij Bhushan Singh) यांनी फेटाळून लावले आहेत. ज्यावेळी पीडितेवर अत्याचार झाला तेव्हा मी भारतातच नव्हतो, असे बृजभूषण यांनी म्हटले आहे.

    महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाप्रकरणी बृजभूषण यांच्यावर गुरुवारी आरोप निश्चित करण्यात येणार होते. परंतु, हा आदेश दिल्लीतील राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने पुढे ढकलला आहे. बृजभूषण यांनी या प्रकरणी पुढील म्हणणे मांडण्यासाठी कोर्टात नवीन अर्ज दाखल केला होता.

    उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

    उत्तर प्रदेशातील दोन जागांवर भाजपने आपले पत्ते उघडलेले नाहीत. त्या जागा म्हणजे रायबरेली आणि कैसरगंज, कैसरगंज येथून बृजभूषण खासदार आहेत. यावेळी पक्ष त्यांना संधी देऊ इच्छित नसल्याचे मानले जात आहे. कैसरगंज सीटवरून पुन्हा तिकीट मिळण्याचे काही संकेत आहेत.

    आरोपनिश्चितीला उशीर व्हावा याकरता ही युक्ती करण्यात येत असल्याचे पीडितांकडून म्हटले जात आहे. त्यामुळे त्यांनी या अर्जाला विरोध केला. दिल्ली पोलिसांचे प्रतिनिधित्व करणारे सहाय्यक सरकारी वकील अतुल श्रीवास्तव म्हणाले की, अर्ज उशिराने दाखल करण्यात आला आहे आणि पुढील चौकशीची मागणी केली आहे.