देशातील पहिली रॅपिड ट्रेन रुळावर धावली; गाझियाबादमध्ये मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझियाबादमध्ये रॅपिड-एक्स रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींनीही रेल्वेने प्रवास केला. ही ट्रेन पहिल्या टप्प्यात गाझियाबाद ते दुहईपर्यंत धावणार आहे. त्याचे तिकीट 50 रुपयापासून 100 रुपयांपर्यंत आहे.

    गाझियाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझियाबादमध्ये रॅपिड-एक्स रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींनीही रेल्वेने प्रवास केला. ही ट्रेन पहिल्या टप्प्यात गाझियाबाद ते दुहईपर्यंत धावणार आहे. ही ट्रेन 17 किमीचे अंतर काही मिनिटांत पूर्ण करेल. रॅपिड एक्सला देशाची मिनी बुलेट ट्रेन म्हटले जात आहे. ही भारतातील पहिली रॅपिडएक्स ट्रेन आहे जी नमो भारत म्हणून ओळखली जाईल. यामुळे, मेरठ-गाझियाबादमधील आर्थिक विकासालाही वेग येण्याची अपेक्षा आहे.
    नमो भारत रॅपिड एक्सच वैशिष्ट्य हे आहे की, या ट्रेनचा स्पीड 160 किमी प्रतितास आहे. ही ट्रेन देशातील सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारताला वेगामध्ये टक्कर देईल. रॅपिडएक्समध्ये सेफ्टीची जबाबदारी आर्टिफिशल इंटेलिजेंसवर असेल. या ट्रेनमध्ये ओव्हरहेड सामान रेक, वाय-फाय, प्रत्येक सीटसाठी मोबाइल चार्जिंगची सुविधा देण्यात आलीय. सध्या देशात वंदे भारत ट्रेनची चर्चा आहे. या ट्रेनला प्रवाशांची मोठी पसंती मिळतेय. लवकरच रॅपिड मेट्रो म्हणजे नमो भारत ट्रेनला सुद्धा तशीच पसंती मिळेल.
    तिकीटसाठी डिजिटल क्यू आर कोड बेस तिकीट मोड सुरु केलं जाईल. रॅपिडएक्स कनेक्ट App च्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या तिकीट बुक करु शकता. त्याशिवाय नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डच्या माध्यमातून तुम्ही प्रवास करु शकता. या ट्रेनमध्ये दिल्ली मेट्रोच कार्ड चालणार नाही. एनसीएमसी कार्डला कमीत कमी 100 रुपयापर्यंत रिचार्ज कराव लागेल. रॅपिड रेल प्रोजेक्ट दिल्ली ते मेरठपर्यंत बनणार आहे. हे अंतर एकूण 82 किलोमीटर आहे. पहिल्या फेजमध्ये दुहाई ते साहिबाबाद हा 17 किलोमीटरचा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या फेजमध्ये साहिबाबाद, गाजियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डेपो हे एकूण पाच स्टेशन्स आहेत.