देशभरात जोरदार पावसाचा इशारा (फोटो - ani)
देशभरात पावसाचा इशारा
अनेक रंज्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
India Weather Update: काल देशभरात संमिश्र असे हवामान पाहायला मिळाले. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू होता. तर अनेक राज्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला आहे. मात्र आज पुन्हा देशभरात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
भारतीय हवामान विभागाने झारखंड, पश्चिम बंगाल, ओडीशा आणि बिहार राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दिल्लीत काही दिवस उकाडा जाणवत होता. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देसभरत पावसाळा पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अंदमान, निकोबारसह अनेक राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल , गुजरात आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आसाम, मेघालय अरुणाचल प्रदेश, नागालँड राज्यांमध्ये देखील भारतीय हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. 1 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही राज्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. सिक्कीम आणि दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.गुजरातमध्ये आणि महराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सौराष्ट्र भागात हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
India Rain Alert: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात वरुणराजा तांडव करणार; IMD च्या रेड अलर्टने थेट…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज
हवामान खात्याने बृहन्मुंबई प्रदेश, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानुसार आज पाच जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. ऑरेंज अलर्टनुसार मुंबई, रायगड, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, बीएमसीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाच तासांत काही पश्चिम उपनगरांमध्ये ५० मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला.
देशातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात पश्चिम बंगालमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोलकाता आणि आसपासच्या भागात सोमवारी रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.