Photo Credit- Social media
मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक गौप्यस्फोट होत आहेत. तसेच लवकरच नवीन युती तयार होत असल्याची चर्चा देखील सुरु आहे. महाविकास आघाडीमध्ये अतंर्गत वाद सुरु असून आगामी निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेना ठाकरे गटाने घेतला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांसाठी महाविकास आघाडी तुटली आहे. यावरुन जोरदार राजकारण रंगलेले असताना खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी पूर्णपणे तुटली आहे का? याबाबत सवाल करण्यात आला आहे.
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच जेष्ठ नेते शरद पवार यांची देखील संजय राऊत यांनी भेट घेतली आहे. यावरुन प्रश्न केला असता संजय राऊत म्हणाले की, शरद पवार आणि मी भेटलो यात नवीन काय. महाराष्ट्रात एकमेकांना भेटत राहिलं पाहिजे. कटुता ही सत्ताधारी पक्षात आहे. महाविकासाआघाडीत कोणत्याही प्रकराची कटुता नाही. आमच्यात कोणतेही भेदा-भेद नाही. माझ्यात आणि शरद पवारांमध्ये नक्कीच चर्चा झाली. आज शरद पवार पत्रकार परिषद घेणार आहेत, असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्याचबरोबर खासदार संजय राऊत यांना महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे का? असा सवाल करण्यात आला. यावर राऊत म्हणाले की, “देशामध्ये इंडिया आघाडी नक्कीच राहिल. महाविकास आघाडीही नक्कीच राहिल. जर आम्ही इंडिया आघाडीला जिवंत ठेवलं नाही, तर विरोधक शिल्लक राहणार नाहीत. हे विरोधकांना संपवतील. हे हुकूमशाह आहेत. आमच्यासमोर खूप खतरनाक लोक आहेत. इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकांसाठीच बनवली होती. पण आता ती तशीच कायम ठेवणं देशाची गरज आहे. लोकशाहीची गरज आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुका होतात. काँग्रेस आणि आप हे एकत्र लढले होते. त्यांची एकही जागा निवडून आली नाही. जर बसून या गोष्टी चर्चेने संपल्या असत्या तर आम्हालाही आनंद वाटला असता. महाराष्ट्रातही आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या आम्ही स्वबळावर लढू असे सांगितले आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला युती करणं कठीण असते,” असे स्पष्टीकरण देत खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडी व महाविकास आघाडी कायम असल्याचे सांगितले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. शिंदे गटाच्या या निर्णायवर आता ठाकरे गट आक्रमक झाले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, “एक लक्षात घ्या, ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माज आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कुणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो. दिल्लीचे बूट चाटणं , महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणं हे मोठं कार्य असेल तर शिंदेंचा गट ते करतो आहे. आम्ही स्वाभिमानाने उभे आहोत. जे लोक फडफड करत आहेत पाळलेले पोपट त्यांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही. त्या सगळ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची शकलं करुन महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे. हातात पैसा आणि सत्ता असल्याने यांची मस्ती चालली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना काढा हे बोलताना यांच्या जिभा झडत कशा नाहीत?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.