बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरला हायकोर्टाचा दणका ( फोटो-टीम नवराष्ट्र)
नवी दिल्ली: प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली.असे अनेक आरोप पूजा खेडकरवर करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. दरम्यान यावर आज सुनावणी पार पडली.
दिल्ली हायकोर्टाने बनावट आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला आहे. त्यामुळे पूजा खेडकरला मोठा धक्का मानला जात आहे. आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टाने पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण दिले होते. ते संरक्षण देखील हायकोर्टाने आता काढून घेतली आहे. हे प्रकरण केवळ यूपीएससीची नव्हे तर समजायची फसवणूक करणारे आहे असे कोर्टाने म्हटल्याचे समजते आहे.
काय आहे प्रकरण?
प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात एक महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला होता.यात नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 दरम्यान पुजा खेडकरने अपंगत्वाचे खोटे दाखले देऊन परीक्षा दिल्याचा दावा करण्यात आला होता. बनावट अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली. इतकेच नव्हेतर परीक्षेत कमी गुण मिळूनही सवलतींच्या आधारे ती परीक्षाही उत्तीर्ण झाली. UPSC मध्ये 841 ऑल इंडिया रँक (AIR) मिळवले. पण दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या तपासादरम्यान तिने बनावट अपंगत्व प्रमाणपत्र बनवले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टनुसार पूजा खेडकरने 2022 आणि 2024 मध्ये अहमदनगरच्या वैद्यकीय प्राधिकरणाकडून मिळवलेली दोन अपंगत्व प्रमाणपत्रे ही बनावट असू शकतात. पण त्यांची वैद्यकीय प्राधिकरणाकडून पडताळणी केली असता त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. त्यामुळे पूजा खेडकर दावा करत असलेले अपंगत्व प्रमाणपत्र वैद्यकीय प्राधिकरणाकडून देण्यात आलेले नसावे, असे प्राधिकरणाने म्हटले.
हेही वाचा: बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण; दिल्ली हायकोर्टाने दिला ‘हा’ मोठा दिलासा
दिल्ली पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी पूजा खेडकर प्रकरणात दिल्ली हायकोर्टात अहवाल सादर केला. निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने दोन अपंगत्व प्रमाणपत्र सादर केली होती. त्यापैकी एक बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान ३१ जुलै रोजी यूपीएससीने पूजा खेडकरची निवड रद्द केली होती. त्यानंतर तिला भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यास बंदी घातली होती. आयोगाने पूजा खेडकरविरुद्ध दिल्ली पोलिसांकडे देखील गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात यूपीएससीला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा दावा पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टमध्ये केला होता. २०१९, २०२१, २०२२ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीवेळी गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे माझी ओळख व्हेरिफाय केली आहे. आयोगाने माझ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे आयोगाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे पूजा खेडकरचे म्हणणे आहे.
हेही वाचा: पुजा खेडकरचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट; दिल्ली पोलिसांचा अहवाल समोर
या प्रकरणात यूपीएससीला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचा दावा पूजा खेडकरने दिल्ली हायकोर्टमध्ये केला होता. २०१९, २०२१, २०२२ मध्ये व्यक्तिमत्व चाचणीवेळी गोळा केलेल्या बायोमेट्रिक डेटाद्वारे माझी ओळख व्हेरिफाय केली आहे. आयोगाने माझ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे. त्यामुळे आयोगाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नसल्याचे पूजा खेडकरचे म्हणणे आहे.