भारतीय संघाने न्यूझीलंडचा ७ विकेट्सने उडवला धुव्वा(फोटो-सोशल मीडिया)
India Under-19 vs New Zealand Under-19 : आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषकातील २४ वा सामना भारतीय १९ वर्षांखालील आणि न्यूझीलंड १९ वर्षांखालील संघ यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने बाजी मारली. न्यूझीलंडविरुद्धच्या या विजयासह भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषकातील सलग तिसरा विजय नोंदवत सुपर-६ मध्ये प्रवेश केला आहे.
बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पावसामुळे टॉस उशिरा झाला होता. ज्यामुळे प्रत्येकी १३ षटके कमी कारवाई लागली होती. टॉस जिंकल्यानंतर भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार आयुष म्हात्रेचा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थकी ठरवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने सर्व विकेट्स गमावून १३५ धावा उभ्या केल्या.
हेही वाचा : तो आला रे! ‘माही मार रहा है’, ऐकायला तयार रहा! IPL 2026 साठी MS DHONI चा सराव सुरू; VIRAL VIDEO
प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने १० षटकांत पाच विकेट्स गमावल्या. आर्यन मान फक्त ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर ह्युगो बोघ टिकू शकला नाही आणि तो ४ धावांवर माघारी गेला. त्यानंतर कर्णधार टॉम जोन्स २ धावा, स्नेहित रेड्डी १० धावा, मार्को विल्यम्स १ धावांवर बाद झाला. त्यानंतर जेकब कॉटर आणि जसकरण संधू यांनी डाव सावरत ३७ धावांची भागीदारी रचली. जसकरणही १८ धावा करून बाद झाला. . त्यानंतर जेकब कॉटर २३ धावांवर माघारी गेला. सेल्विन संजयन २८ धावा, फ्लिन मोरे १ धावा, मेसन क्लार्क ४ धावांवर बाद झाले तर कॅलम सॅमसन एका टोकावर ३७ धावा काढून नाबाद राहिला. परिणामी न्यूझीलंड संघ १३५ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय अंडर-१९ संघाकडून अम्ब्रिसने सर्वाधिक ४ बळी घेतले. हेनिल पटेलने ३, खिलन पटेलने १, मोहम्मद अनान आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
Innings Break! On the back of 4⃣/2⃣9⃣ from Ambrish R.S, India U19 restrict New Zealand U19 to 135 🙌 Over to our batters ⌛️ Scorecard ▶️ https://t.co/tsYh3Rm1eV #U19WorldCup pic.twitter.com/1H2Q7RDNGf — BCCI (@BCCI) January 24, 2026
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. आरोन जॉर्ज ७ धावांवर माघारी गेला. त्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे यांनी ७६ धावांची भागीदारी करत डाव सावरला. केली. वैभव सूर्यवंशी ४० धावा काढून बाद झाला. त्याने २ चौकार आणि ३ षटकार मारले. त्यानंतर आयुष म्हात्रेने ५३ धावांचे महत्वपूर्ण योगदान देऊन बाद झाला. त्याने आपल्या खेळी दरम्यान २ चौकार आणि ६ षटकार लगावले. त्यानंतर विहान मल्होत्राने १७ आणि वेदांत त्रिवेदीने १३ धावा करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने, जसकरणने आणि सेल्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.






