भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा लागु करण्यावरुन आधीच मते मतांतर असताना आता हा विषय पुन्हा नव्याने चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्याच कारण म्हणजे लोकसंख्येबाबत नुकतंच समोर आलेलं विधान. बागेश्वर बाबा (Bageshwar Dham) नंतर आता कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराजांच (Devkinandan Thakur Maharaj ) नाव चर्चेत आलं आहे. ते अंधश्रद्धेबाबतच्या कुठल्याही विषयावरुन त्यांनी कुठलही वक्तव्य केलं नसुन देशातील लोकसंख्येबद्दर त्यांनी अजब विधान केलं आहे. भारतात लोकसंख्या नियंत्रण कायदा (Population) होईपर्यत प्रत्येक हिंदू व्यक्तीने पाच-पाच, सहा- सहा मुलांना जन्माला घातले पाहिजे, असे आवाहन कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केलं आहे. महाराजांच्या या आवाहनामुळे नवा वाद उद््भवण्याची शक्यता आहे.
[read_also content=”सऱ्या माणसासोबत संसार थाटायची घाई! बायकोनं नवऱ्यासह सासुची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे फेकले नदीत https://www.navarashtra.com/crime/woman-kills-husband-mother-in-law-in-assam-chops-them-into-pieces-dumps-body-parts-in-meghalaya-370886.html”]
एका पत्रकार परिषदेदरम्यान देवकीनंदन ठाकूर महाराज म्हणाले की, जोपर्यंत देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा होत नाही तोपर्यंत प्रत्येक सनातनी हिंदूने पाच-सहा मुलांना जन्म द्यावा. स्वातंत्र्यानंतर सनातनी हिंदूंना अन्यायकारक वागणूक मिळाली. चार बायका आणि चाळीस मुलं असंही म्हटलं होतं. त्यामुळेच हिंदूंनी वेळेवर लग्न करावे आणि त्यांना किमान पाच ते सहा मुले असावीत, असे वादग्रस्त विधान देवकीनंदन ठाकूर महाराज यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.. दरम्यान, गेल्या वर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात देवकीनंदन यांना सौदीतील एका कॉलरने मोबाइल कॉलवर शिवीगाळ करत चौकात जिवंत जाळण्याची धमकी दिली होती.