पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाखो लोकांन घरे मिळाली आहेत. या योजनेद्वारे सरकार देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांना कमी पैशात घर देते. या योजनेद्वारे सरकार ज्यांच्याकडे कच्ची घरे आहेत त्यांच्या खात्यावर पैसे हस्तांतरित करतात.
सपाट भागात घर बांधण्यासाठी १.२० लाख रुपये आणि डोंगराळ भागात घर बांधण्यासाठी १.३० लाख रुपये शासनाकडून दिले जातात. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने ३ उत्पन्न स्लॅब तयार केले आहेत.
पहिली श्रेणी म्हणजे ते लोक ज्यांचे उत्पन्न ३ लाखांपेक्षा कमी आहे, तर दुसरी श्रेणी म्हणजे ज्यांचे उत्पन्न ३ ते ६ लाखांच्या दरम्यान आहे. तसेच तिसरा वर्ग म्हणजे ज्यांचे उत्पन्न ६ ते १२ लाखांच्या श्रेणीत आहे.
पीएम आवास योजनेची यादी तपासण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://pmayg.nic.in/netiay/home.aspx या वेबसाइटवर क्लिक करावे लागेल. या वेबसाइटवरील Awaassoft पर्यायावर क्लिक करा. त्यामध्ये Report पर्यायावर क्लिक करा. रिपोर्ट पर्यायावर क्लिक केल्यावर, तुमच्यासाठी एक नवीन पृष्ठ उघडेल. त्यातील H विभागावर क्लिक करा.
मग तुम्हाला येथे व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यासाठी तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक. गाव इत्यादी तपशील भरावे लागतील. तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला पीएम आवास योजना ग्रामीण २०२२ ची संपूर्ण यादी दिसेल. या यादीमध्ये तुम्ही तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही ते तपासू शकता.