(फोटो सौजन्य-ट्विटर)
बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर या शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कारवाई करण्यास उशीर करणाऱ्या शाळेविरोधात, गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलीस प्रशासनाविरोधात बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं.
या घटनेनंतर गुजरात मधील एका लहान मुलीचा फोटो वापरत बदलापूरमध्ये अत्याचार झालेली मुलगी हीच असल्याचा दावा करत सोशल मीडियावर करण्यात आला. या व्हायरल पोस्टनंतर बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गुजरात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. आमच्या मुलीची बदनामी करू नका अशी विनवणी तिच्या आई वडलांनी केली आहे.
गुजरातमधील अहमदाबाद येथे राहणारे अविनाश जाधव हे कुबेरनगर कैकाडी निवास येथे राहत आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या चार वर्षीय मुलीचा डेंग्यू या आजाराने वर्षाच्या निधन झाले आहे. त्याचं दरम्यान बदलापूर येथील दोन मुलींवर झालेल्या अत्याचार बाबतची घटना एकावेळीच आल्याने महाराष्ट्रातील एका समाजकंटाकने आमच्या मुलीचा फोटोवर बदलापूर येथील घटनाक्रम लिहून बॅनर तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे.
मात्र या मुलीचा सोशल मीडियावरील चुकीची पोस्ट व्हायरलं केला गेल्यामुळे बदनामी झाली असल्याने पालकांनी थेट गुजरात क्राईम ब्रांच सायबर सेल विभगात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी आणि बदनामी कारक पोस्ट थांबवावी अशी विनंती पालकांनी केली आहे.
गुजरातमधील लहान मुलीची पोस्ट
आरोही अविनाश जाधव वय 4 वर्षे तिचा नरोडा पाटिया अहमदाबाद येथील ऍपल इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ येथे मृत्यू झाला 20-08-2024 रोजी मृत्यू झाला आहे. दुपारी 12:10 वाजण्याच्या सुमारास डेंग्यू गाल ग्युरफ्रॉम या आजाराने मृत्यू झाला. नातेवाईकांकडून, बदलापूर मुंबई येथील शालेय विद्या मंदिर येथे 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची पोस्ट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली. दुर्दैवाने, ही पोस्ट गुजरात येथील दिवंगत आरोही अविनाश जाधव हिचा फोटो संशयास्पद लोकांद्वारे व्हायरलं केली होती आणि तेव्हापासून ती व्हायरल झाली आहे, ज्यामुळे विनाकारण नकारात्मक लक्ष, माझ्या चारित्र्याची बदनामी झाली असल्याची तक्रार दाखल केली आहे.बदलापूर येथील पालकांचा आक्रोश पाहता, गुजरात अहमदाबाद येथील आमच्या गरीब कुटुंबाची बदनामी थांबविण्यासाठी पालकांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री यांच्याकडे विनवणी केली आहे.
गुजरात येथील असलेल्या पालकांनी त्यांच्या मुलीचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला आहे. मात्र बदलापूर प्रकणाशी संबंध नसतानाही समाजकंटाकांनी या चुमकुलीचा फोटो वापरून बदलापूर प्रकरणातील असल्याचे पोस्ट व्हायरलं गेल्यामुळे बदनामी झाल्याने पालकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे मागणी केली आहे.