भारतचा इस्रायलसोबत मोठा संरक्षण करार; देशाच्या नौदलात सामील होणार 'हे' शक्तीशाली ड्रोन ( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्रायलच्या शत्रूंनी व्हावे सावध! नेतन्याहूंच्या सैन्यात सामील होणार ‘हे’ धोकादायक शस्त्र
ऑपरेशन सिंदर (Operation Sindoor) दरम्यान भारताने पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात Heron MK-II Drones चा वापर केला होता. या ड्रोनची क्षमता पाहिल्यानंतर भारताने हे ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या करारांतर्गत भारताला इस्रायलकडून अतिरिक्त Heron MK-II Drones मिळाली आहे. इस्रायलच्या संरक्षण अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे.
हे Heron MK-II Drones ड्रोन भारताच्या नौदलात सामील होणार आहे. यामध्ये सध्या भारताकडे एक ड्रोन आधीच आहे. या संरक्षण करारमुळे भारत आणि इस्रायलमधील धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होईल. गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशांत ही भागीदारी सुरु आहे, जिला अधिक बळकटी मिळले. तसेच भारतासाठी इस्रायल शस्त्र खरेदीसाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे.
हे Heron MK-II Drones ३५ हजार फूट उंचीवर पोहोचू शकते आणि सलग ४५ तास हवेत उड्डाण करु शकते. सध्या भारत इस्रायलकडून किती ड्रोन्स खरेदी करणार आहे, याची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. भारत याचे एक ड्रोन आधीच वापरत आहे.
भारताच्या मेक इन इंडियाला गती
इस्रायलच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्याने भारताच्या मेक इन इंडियाचाही उल्लेख केला. अधिकाऱ्याने म्हटले की, भारत केवळ ड्रोन खरेदी करणार नसनू त्याचे भारतात उत्पादन देखील करणार आहे. या ड्रोनमुळे निश्चितच भारताच्या नौदलाची क्षमता वाढणार आहे. युद्धभूमीवर हे ड्रोन गेम चेंजर ठरू शकते.
Ans: भारताने इस्रायलसोबत आपत्कालीन तरुतुदींनुसार, Heron MK-II Drones ड्रोन खरेदीचा मोठा संरक्षण करार केला आहे.
Ans: Heron MK-II Drones भारताच्या नौदलात सामील होणार आहे?
Ans: Heron MK-II Drone हे ३५ हजार फूट उंचीपर्यंत सलग ४५ तास उड्डाण करु शकते. तसेच हे ड्रोन सर्व्हेलन्ससाठी आणि टेहळणीसाठी देखील उत्तम आहे.
Ans: भारताने या Heron MK-II Drone चा वापर पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात ऑपरेशन सिंदूरदरम्यान केला आहे.






