हैद्राबाद : तेलंगणातील (Telangana) सिकंदराबाद (Sikandrabad) येथे आज पहाटे इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमला (Electric Scooter Showroom) भीषण आग (Fire) लागली. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. एका हॉटेलच्या तळमजल्यावर असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर रिचार्जिंग युनिटमध्ये आग लागून ही दुर्घटना घडल्याचे हैदराबादचे (Hyderabad) आयुक्त सीव्ही आनंद यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक स्कूटर शोरूमच्या घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, यामध्ये कुणी अडकले आहेत का? याचा शोध घेण्याचे काम सध्या सुरू आहे. सिकंदराबाद येथील एका भागात रूबी लॉज आहे. याच्या तळमजल्यावर इलेक्ट्रिक स्कूटरचे चार्जिंग स्टेशन आहे.
Telangana | Six dead after a fire broke out at a hotel in Secunderabad. Fire broke out in electric scooter recharging unit on ground floor, smoke from which overpowered the people staying on 1st & 2nd floors: Hyderabad Commissioner CV Anand pic.twitter.com/35Hbn3GgwW
— ANI (@ANI) September 13, 2022
सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक एका गाडीच्या बॅटरीचा स्फोट (Battery Blast) झाला आणि आग लागली. ही आग काही क्षणात वर असलेल्या हॉटेलपर्यंत पोहोचली. रात्रीची वेळ असल्याने हॉटेलमधील नागरिकांना काही समजण्याच्या आतच आगीने रौद्ररूप धारण केले. काहींनी जीव वाचवण्यासाठी हॉटेलच्या खिडक्यांमधून उड्या मारल्या. मात्र, काहींना या घटनेचा अंदाज न आल्याने आग आणि धुरामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.