फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम
नवी दिल्ली: उत्तराखंडमधील केदारनामध्ये एक मोठी दुर्घटना घडली. एक हेलिकॉप्टर घेऊन जाताना अचानक नदीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक खराब हैलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाताना अचानक गिरक्या घेत खाली पडले. भारतीय वायुसेनेचे एम आय 17 हेलिकॉप्टर एक खराब झालेले हेलिकॉप्टर घेऊन जात होते. त्यादरम्यान MI 17 हेलिकॉप्टरचा तोल जाऊन हे हेलिकॉप्टर काली पडले. मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वीच केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची दुर्घटना घडली होती. तेच हेलिकॉप्टर शनिवारी सकाळी क्रॅश झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
जोरदार वाऱ्यामुळे हेलिकॉप्टर लोलक सारखे थरथरू लागले
वायुसेनेच्या म्हणण्यानुसार, पायलटच्या लक्षात आले की हेलिकॉप्टर पडू शकते आणि एमआय 17 चे नुकसान होऊ शकते, त्यामुळे पायलटने ते सुरक्षित ठिकाणी टाकले. जिल्हा पर्यटन अधिकारी राहुल चौबे यांनी सांगितले की, 24 मे 2024 रोजी क्रिस्टल एव्हिएशन कंपनीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाच्या सावधगिरीमुळे हेलीचे केदारनाथ हेलिपॅडच्या काही अंतरावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलीतील सर्व प्रवाशांचे सुरक्षित लँडिंग झाले.
The KESTRAL Aircraft which was being taken underslung from #KedarNath to #Gauchar has been released midway on the river near Bhimballi#helicopter #India #BreakingNews #safefly #chardham pic.twitter.com/zDooyF7dY0
— Safe Fly Aviation (@AirCharterIndia) August 31, 2024
शनिवारी दुरूस्तीसाठी हेली गौचर हवाईपट्टीवर नेण्यात येत होते. त्यानुसार क्रिस्टल एव्हिएशनची हेली हवाई दलाच्या एमआय 17 हेलिकॉप्टरमधून टांगून गौचर येथे घेऊन चालले होते. असे पर्यटन अधिकाऱ्याने सांगितले. सकाळी थोड्या अंतरावर येताच हेलिकॉप्टरचे वजन आणि वाऱ्याच्या प्रभावामुळे MI 17 ने आपला तोल सोडण्यास सुरुवात केली, त्यामुळे थारू कॅम्पजवळ आल्यानंतर हेलिकॉप्टरला MI 17 वरून खाली सोडावे लागले. हेलीमध्ये कोणतेही प्रवासी किंवा उपकरणे नव्हती. माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. टीम परिस्थितीचा अंदाज घेत आहे. हेली अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची अफवा पसरवू नका, असे आवाहन त्यांनी सर्व लोकांना केले आहे.
हे देखील वाचा – आता दिल्ली पोलिसांकडूनच मिळणार पैसे; 50 हजार बक्षिस मिळवण्याची संधी