भाजपचे माजी आमदार झारखंड मुक्ती मोर्चात दाखल (फोटो- ट्विटर)
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्ये देखील निवडणूक होणार आहे. १३ आणि २० नोव्हेंबररोजी झारखंडमध्ये मतदान होणार आहे. दोन टप्प्यांमध्ये झारखंडमध्ये निवडणूक होणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान झारखंडमध्ये राजकीय घडामोडी अत्यंत वेगवान होताना पाहायला मिळत आहेत. झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपमध्ये मुख्य लढत होणार आहे. त्याआधीच झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपला मोठा धक्का दिल आहे.
झारखंड विधानसभेच्या तोंडावर झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपला मोठा धक्का दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या तीन माजी आमदारांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात प्रवेश केला आहे. लुईस मारांडी, कुणाल सारंगी, लक्ष्मण तूडू यांचा समावेश आहे. या भाजपच्या माजी तीन आमदारांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे विधानसभेआधीच भाजपला मोठा फटका बसला आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार राहिलेले केदार हाजरा, एजेएसयू पक्षाचे उमाकांत रजक यांनी देखील झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात प्रवेश केला होता. अशातच आता भाजपच्या ३ माजी आमदारांनी हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात प्रवेश केला आहे. जेएमएम पक्षात जाताना त्यांनी भाजपवर अनेक आरोप केल्याचे समजते आहे. लुईस मरांडी यांनी दुमका मतदारसंघातून अनेकदा निवडणूक लढवली आहे. त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा देखील पराभव केला होता.
लुईस मारांडी यांनी झारखंड मुक्ती मोर्चात प्रवेश केल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांचे स्वागत केले. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि एजेएसयू पक्षाने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दरम्यान सुनील सोरेन यांना दुमका मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने लुईस मारांडी नाराज झाले होते. यामुळे थेट मारांडी यांनी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षात प्रवेश केला आहे.