केरळमध्ये अमेरिकेसारखी घटना, माजी विद्यार्थ्याचा शाळेत घुसून गोळीबार!

जगन नावाचा माजी विद्यार्थी त्रिशूरच्या विवेकोदयम शाळेत आला. स्टाफ रूममध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने बॅगेतून बंदूक काढून अनेक वर्गात जाऊन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना घाबरवले.

    त्रिशूर : अमेरिकेत क्षुल्लक क्षुल्लक कारणावरुन गोळीबार (Firing) करण्यात येत असल्याच्या घटना नेहमी समोर येतात. यावरुन अनेकदा चिंता व्यक्त केली जाते. या समस्येवर योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, आता अशीच एक घटना आता भारतात घडली आहे. शिक्षणाच्या बाबतील अग्रेसर मानल्या जाणाऱ्या केरळमधील त्रिशूरमध्ये (Thrissur)  मंगळवारी एका खासगी शाळेतील माजी विद्यार्थ्याने शाळेत बंदूक घेऊन प्रवेश केला आणि गोळीबार करत कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना घाबरवले, त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सुदैवाने या घटनेत कुणी जखमी झालं नाही.

    नेमकं काय घडलं?

    जगन नावाचा माजी विद्यार्थी त्रिशूरच्या विवेकोदयम शाळेत आला. स्टाफ रूममध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने बॅगेतून बंदूक काढून अनेक वर्गात जाऊन विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना घाबरवले. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर लगेचच जिल्हा दंडाधिकारी व्ही.आर. कृष्णा तेजा यांनी शाळेत पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकारातील हे एकमेव प्रकरण असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी पालकांना काळजी न करण्याचे आवाहन करून आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

    तसेच तो मानसिकदृष्ट्या थोडा अस्थिर दिसत होता. सध्या त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, अशा प्रकारची ही एकमेव घटना असून तपास सुरू आहे. काळजी करण्यासारखे काहीही नाही. आम्ही सर्व येथे आहोत. त्याला डॉक्टरांकडे नेले जाईल.” अशीही माहिती त्यांनी दिली.

    आरोपीचे वय अद्याप समजू शकलेले नाही. स्टाफ रूममध्ये बसलेल्या आरोपीचे चित्र दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित झाले असून त्यात तो बॅगेतून बंदूक काढून ती हवेत गोळीबार करतान दिसत आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मात्र खळबळ उडाली आहे.