मणीपूरमध्ये निवडणुकीतही शांतता नाहीच! मतदान केंद्रावर झालेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू

मणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान एका मतदान केंद्रावर गोळीबार झाला असून, त्यात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

  आधीच जातीय हिंसाचाराच्या () आगीत होरपळून निघालेल्या मणिपूरमध्ये आता निवडणूकही शांततेत (lok sabha election) पार पडताना दिसत नाही आहे. आज मणिपूरमध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार झाला आहे. येथील एका बूथवर गोळीबार (Firing At Polling Booth) झाला. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये मतदान केंद्रावर बंदुकांचा आवाज ऐकू येत आहे.

  मणिपूरमध्ये हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन मोठ्या प्रमाणात केंद्रीय दल तैनात करण्यात आले होते. यानंतरही गोळीबार झाला. मोइरांग विधानसभा मतदारसंघातील थामनपोकपी येथे ही घटना घडली. घटनास्थळी सुरक्षा दलाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

  इम्फाळ पूर्वमध्ये ईव्हीएमची नासधूस

  याशिवाय, इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील थोंगजू विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावरही हिंसाचार झाल्याची माहिती मिळा ली आहे. इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील भामोन कंपूमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे खराब झाल्याची माहिती मिळाली आहे. मतदारांनी मतदान केंद्रावर हल्ला केला आहे.

   मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार

  मणिपूर ३ मे २०२३ पासून जातीय हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. ३ मे रोजी काढण्यात आलेल्या आदिवासी एकता रॅलीनंतर हिंसाचार सुरू झाला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आदिवासी एकता रॅली काढण्यात आली. यानंतर मेईतेई आणि कुकी समाजातील लोकांमध्ये संघर्ष सुरू झाला.