गुगल मॅप्सने घेतला तिघांचा बळी; त्या अपघातातवर गुगलने दिलेलं उत्तर चर्चेत
उत्तर प्रदेशमधील बरेली जिल्ह्यात लग्नाला जात असलेल्या एका वाहनाचा २४ नोव्हेंबर रोडी अपघात झाला. गुगल मॅप्सने रस्ता दाखवला मात्र पूल अर्धवट होता, याचा अंदाज न आल्यामुळे कार पुलावरून खाली कोसळली होती. यात तीन तरुणांना प्राण गमवावे लागले. या निष्काळजीपणाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागातील चार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुगलच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनाही याप्रकरणी जबाबदार धरल्यानंतर गुगलने या प्रकरणी खुलासा केला आहे.
अपघातासंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या अपघातानंतर गुगलच्या वतीने या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्याप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. संबंधित यंत्रणेबरोबर तपासात गुगल सहकार्य करेल, असं गुगलच्या प्रवक्त्यांनी एएफपी वृत्तसंस्थेला पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटलं आहे.
A Google Maps navigator killed three Indians when a car drove off an unfinished bridge. But the app thought it was passable.
On Saturday night, a group of people were rushing to a wedding and were confidently speeding down the road until their car suddenly plunged down. pic.twitter.com/d21DlsbSkj
— 𝕏 Ali Al Samahi 𝕏 (@alsamahi) November 26, 2024
गुरुग्रामहून तीन तरुण उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात लग्नासाठी जात होते. मात्र रस्ता माहिती नव्हता. त्यामुळे गुगल मॅप्सचा आधार घेण्यात आला. यावेळी गुगल मॅप्सने दाखविलेल्या रस्त्यावरून जात असताना त्यांनी रामगंगा नदीवरील ब्रिजवरचा रस्ता निवडण्यात आला. पण या रस्त्यावरील बदायूँ जिल्ह्यातील दातागंज येथील पूल अर्धवट होता. त्यांचा अंदाज त्या तरुणांना आला नाही आणि गुगलनेही दाखवलं नाही. त्यामुळे अर्धवट पूलावरून थेट नदीत कोसळली. यात तिघाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.
यावर्षी झालेल्या मुसळधार पावसात पुरामुळे नदीतील पुलाचा पुढचा भाग वाहून गेला होता. तेव्हापासून हा पुल अर्धवट स्थिती आहे. मात्र गुगल मॅप्सवर त्याबाबतची माहिती अद्ययावत करण्यात आली नव्हती. गुगल मॅप्सने तीन तरुणांचा बळी घेतला होता. दरम्यान पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार, याप्रकरणी पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गुगलमधील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. मात्र या अधिकाऱ्यांची नावं पोलिसांनी जाहीर केली नाहीत.
देशविदेशातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अपघातातील मृतांमध्ये नितीन कुमार आणि त्याचे चुलत भाऊ अमित कुमार आणि अजीत कुमार यांचा समावेश आहे. हे तिघेही गुरुग्रामवरून निघाले होते बरेली जिल्ह्यात लग्नासाठी जात असताना रामगंगा नदीवर ही दुर्घटना घडली आहे. त्यामुळे आता गुगल मॅप्सवरही शंका उपस्थित केल्या जात आहेत.