2023 च्या अखेरीस भारतातील मुस्लिम लोकसंख्या (Muslim Population In India) 200 दशलक्षांपर्यंत पोहोचेल. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smirti Irani) यांनी लोकसभेत (Lok Sabha) विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली आहे.यादरम्यान त्यांनी देशातील मुस्लिमांची साक्षरता आणि श्रम यांच्याशी संबंधित आकडेवारीही शेअर केली आहे. विशेष म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून येते.
[read_also content=”संतप्त जमावाकडून मणिपूर महिला अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घराला आग, आतापर्यंत 4 जणांना अटक! https://www.navarashtra.com/crime/4-people-arrested-in-manipur-woman-paraded-video-case-mob-set-on-fire-main-accused-house-nrps-434740.html”]
संसदेत तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांनी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला तीन प्रश्न विचारले होते. प्रथम, ‘३० जुलै २०२३ पर्यंत मुस्लिम लोकसंख्येचा काही डेटा आहे का?’.दुसरे, ‘पसमांडा मुस्लिमांच्या लोकसंख्येची काही आकडेवारी सरकारकडे आहे का?’.तिसरा, ‘३१ जुलै २०२३ पर्यंत पसमंडा मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीबद्दल काही माहिती आहे का?’
लोकसंख्या
याबद्दल उत्तर देताना मंत्री इराणी म्हणाल्या की, ‘2011 च्या जनगणनेनुसार मुस्लिम लोकसंख्या 17.22 कोटी होती, जी देशाच्या लोकसंख्येच्या 14.2 टक्के होती.लोकसंख्या प्रक्षेपणावरील तांत्रिक गटाच्या जुलै 2020 च्या अहवालानुसार, 2023 मध्ये देशाची लोकसंख्या 138.82 कोटी होती असा अंदाज आहे.2011 च्या जनगणनेप्रमाणे 14.2 टक्के इतकेच प्रमाण लागू केल्यास, 2023 मध्ये मुस्लिम लोकसंख्या 19.75 कोटी असल्याचा अंदाज आहे.
2021-22 मध्ये पीएलएफएस या नियतकालिक श्रमिक सर्वेक्षण सर्वेक्षणाचा दाखला देत केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले की, मुस्लिम लोकसंख्येच्या शिक्षणाची माहिती दिली. त्या म्हणाऱ्या 7 वर्षे व त्यावरील मुस्लिमांमध्ये साक्षरतेचे प्रमाण 77.7 टक्के आहे प्रत्येक वयोगटातील श्रमशक्तीचा सहभाग दर 35.1 टक्के आहे.जागतिक बँकेच्या मते, श्रमशक्ती सहभाग दर 15 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकसंख्येचा संदर्भ देते जे आर्थिकदृष्ट्या सक्रिय आहेत आणि काम करतात.
2020-21 च्या सरकारी सर्वेक्षणानुसार, देशातील 94.9 टक्के मुस्लिमांकडे पिण्याच्या पाण्याचे चांगले स्त्रोत आहेत आणि 97.2 लोकांकडे शौचालयाची चांगली सोय आहे. ३१ मार्च २०१४ नंतर ५०.२ टक्के मुस्लिम कुटुंबांनी नवीन घरे किंवा फ्लॅट खरेदी केले किंवा बांधले.