Delhi High Court: श्वास घेणेही महाग? दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; एअर प्युरिफायरवर 18 % GST का? (फोटो-सोशल मीडिया)
नवी दिल्ली : पत्नी पदवीधर आहे म्हणून तिला नोकरी करण्याचे बंधन घालता येणार नाही आणि केवळ पोटगी मागण्यासाठी ती नोकरी करणे मुद्दाम टाळत आहे, असे गृहीत धरता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court ) दिला.
विभक्त पत्नी बी. एस्सी असल्याने ती नोकरी करू शकते. त्यामुळे तिला दरमहा 25 हजार रुपयांऐवजी 15 हजार रुपयांची पोटगी देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या एका याचिकेवर उच्च न्यायालयाने निर्वाळा दिला आहे.
न्या. सुरेश कुमार कैत आणि न्या. नीना बन्सल कृष्णा यांनी संबंधित याचिका फेटाळताना म्हटले की, याप्रकरणातील विभक्त पत्नी पदवीधर आहे, हे नाकारता येत नाही. त्यामुळे कुटुंब न्यायालयाने ठरवून दिलेल्या पोटगीच्या आदेशात बदल करण्याचे काहीच कारण नाही. न्यायालयाने म्हटले आहे की, पत्नी पदवीधर असल्याने तिने नोकरी करावीच, असे बंधन करता येणार नाही.
केवळ पतीकडून पोटगी मिळावी म्हणून ती नोकरी करत नाही, असा अर्थ काढणेही चुकीचे आहे. त्यामुळे कुटुंब न्यायालयाने तिचा आणि कुटुंबाचा खर्च गृहीत धरूनच पोटगीची रक्कम ठरवली आहे.






