राजस्थानमध्ये टॅफेच्या JFarmचे उद्घाटन; शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना सबलीकरणाचा प्रयत्न
मुंबई : जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक असलेल्या ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड (TAFE) ने 2 एप्रिल 2026 रोजी भवानी मंडी येथे आपले अनुकूलन संशोधन केंद्र, टॅफ़े जेफ़ार्म राजस्थानचे उद्घाटन करण्यात आले असून, ज्याद्वारे शाश्वत कृषी पद्धती सामायिक करून शेतीची उत्पादकता आणि शेतकऱ्यांची समृद्धी वाढवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. यावेळी टी.आर. केसवन, गृप प्रेसिडंट – कॉर्पोरेट रिलेशन ॲन्ड अलायन्सेस यांचाद्वारे उद्घाटनानंतर आपले विचार मांडण्यात आले. सुविधेचे उद्घाटन हे संदिप सिन्हा, प्रमुख कार्यकारी अधिकारी टॅफ़े यांचा द्वारे स्थानिक शासकीय संस्थांचा प्रमुख अधिकारी, राजस्थान डिलर भागीदार आणि त्यांचे महत्वाचे पाहुणे आणि ग्राहकांचा उपस्थितीत करण्यात आले.
• कस्टमर एक्सपिरियन्स सेंटर (CEC) – टॅफ़ेचा उत्पादन श्रेणीचा माध्यमातून लाईव प्रात्यक्षिकांसह परिसंवादात्मक अनुभव प्रदान केले जातील
• प्रोडक्ट ट्रेनिंग सेंटर (PTC) – डिलर्स, सर्व्हिसचे कर्मचारी आणि शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देणे
• फ़ार्मर इंटरॅक्शन सेंटर – ज्ञान प्रसार, उत्तम सवयी आणि आधुनिक शेतीय तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करण्याचे केंद्र असणार आहे.
या सुविधेचा हेतू हा शेतकऱ्यांना व्यवहारी माहिती आणि प्रात्यक्षिक उत्पादकता आणि परिणामकारकता वाढविण्यास मदत करण्याचा आहे. केंद्रामध्ये आत्याधुनिक कृषीशास्त्र आणि शेती पद्धतींमधील नूतन प्रगती जसे पिक उत्पादन, संरक्षण आणि प्रक्रिया यासह जागतिक दर्जाची शेतीय यंत्रणा आणि उपाययोजनांचा भारतीय शेती परिस्तथतींमध्ये समावेश केला जाईल.
जेफार्म भवानी मंडी येथील केंद्राचे लक्ष्य हे राजस्थानातील शेतीय परिस्थितींमध्ये बदल घडवून आणण्याचे असून याकरीता त्यांना शेतकऱ्यांचा अधिक सहभाग हवा आहे, ज्यामुळे उत्पादकता आणि शाश्वत भविष्याकडे वाटचाल करता येऊ शकेल. टॅफ़ेचा असा विश्वास आहे की आपल्या ग्राहकांना प्रगतीशील , स्वयंपूर्ण आणि समृद्ध शेतीय समाज बनविण्याकरीता त्यांचे सबळीकरण करणे गरजेचे आहे.
जेफ़ार्म, टॅफ़ेचा व्यापक शेतीय संशोधन आणि प्रशिक्षण उपक्रम असून याची स्थापना केलंबक्कम चेन्नई येथे 1964 साली करण्यात आली आणि तेंव्हापासून शेतीय यंत्रणा आणि जमीनीवरील शेतकऱ्यांचा गरजांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कलंबक्कम सुविधेसह, जेफ़ार्मकडे तेलंगानामध्ये देखील अशी सुविधा आहे. राजस्थानातील जेफ़ार्म आणि प्रोडक्ट ट्रेनिंग सेंटर (PTC) हा सीएसआर उपक्रम असून ही देशातील तीसरी सुविधा आहे.
या उद्घाटनाचा वेळी, टॅफ़ेचे वाईस चेअरमन डॉ. लक्ष्मी वेणू म्हणाले, “ टॅफ़ेमध्ये आमचा नेहमीच हा विश्वास राहिला आहे की, भारतीय शेतीमधील विकास हा त्या क्षेत्रातील स्थानिक माहिती आणि योग्य त्या तंत्रज्ञानाला एकत्रकरूनच मिळविता येऊ शकेल आणि त्याला जोड द्यावी लागेल ती शाश्वततेवरील भक्कम अशा विश्वासाची.जेफ़ार्म राजस्थानचा उद्घाटनामुळे आमचा विश्वास आणि शेतकऱ्यांसाह भागीदार म्हणून त्यांचा विकासात उभे राहण्याची आमची कॉपोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी((CSR) प्रती असलेली बांधिलकी दिसून येते.”
या केंद्रामुळे प्रात्यक्षिक करून बघण्याची जागा उपलब्ध होईल, जिथे शेतकऱ्यांना जमीनीवरील थेट प्रयोग बघता आणि अनुभवता येतील त्यासह पिकांकरीता विशेष उपाययोजना आणि त्याला लक्ष करणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये देखील भाग घेता येऊ शकले. जेफ़ार्म राजस्थान , हे एक महत्वाचे हब असेल ज्याचा माध्यमाने शेतीय तंत्रज्ञानाकरीता एक महत्वाची भूमिका बजावली जाईल आणि त्याचा फ़ायदा हा राजस्थान आणि आजूबाजूचा उत्तर भारतातील शेतकऱ्यांना होईल. टॅफ़ेचा दृष्टीकोन “ जगाची लागवड(कल्टिवेटिंग द वर्ल्ड)” ही राजस्थानातील शेतीय समाजाशी असलेला त्यांचा दीर्घकालीन संबंध अधोरेखीत करते आणि आमचा व्यापक, व्यावहारिक आणि शेतकऱ्यांवर केंद्रित शाश्वत अशा शेतीय विकासाबद्दल असलेला विश्वास वृद्धिंगत करते.”
TAFE – ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड, ही १९६० मध्ये चेन्नई, भारत येथे स्थापन झालेली एक प्रमुख भारतीय ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादकांपैकी एक आणि उत्पादनाच्या बाबतीत भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी म्हणून, TAFE वार्षिक 200,000 पेक्षा जास्त ट्रॅक्टर्सची विक्री करते. उच्च गुणवत्ता आणि कमी परिचालन खर्च यासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या उत्पादनांच्या श्रेणीद्वारे TAFE ने जगभरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. १,६०० हून अधिक डीलर्सचे मजबूत वितरण जाळे TAFE च्या चार आयकॉनिक ट्रॅक्टर ब्रँड्सना – मॅसी फर्ग्युसन इंडिया, टॅफे ट्रॅक्टर्स, आयशर ट्रॅक्टर्स आणि आयएमटी (IMT) – प्रभावीपणे पाठबळ देते. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि रशिया अशा ८० हून अधिक देशांमध्ये TAFE आपले ट्रॅक्टर्स निर्यात करते, ज्यामुळे तेथील शेती क्षेत्राला मोठी मदत होत आहे.
२००५ मध्ये, TAFE ने आपल्या ‘टॅफे मोटर्स अँड ट्रॅक्टर्स लिमिटेड’ (TMTL) या पूर्ण मालकीच्या उपकंपनीद्वारे, जर्मन वारसा असलेल्या सुप्रसिद्ध ‘आयशर’ (Eicher) ब्रँडचा ट्रॅक्टर, इंजिन आणि ट्रान्समिशन व्यवसाय आत्मसात केला. ट्रॅक्टर्सव्यतिरिक्त, TAFE आणि त्यांच्या उपकंपन्यांचे शेतीची यंत्रसामग्री, डिझेल इंजिन आणि जनरेटर, इंजिनिअरिंग प्लास्टिक, गिअर्स आणि ट्रान्समिशन घटक, हायड्रॉलिक पंप आणि सिलिंडर, वाहन फ्रँचायझी आणि मळे (plantations) यांसारख्या विविध क्षेत्रांत व्यावसायिक हितसंबंध आहेत.
टॅफ़ेने प्रसिद्ध असलेल्या सर्बियन ट्रॅक्टर ॲन्ड ॲग्रीकल्चरल इक्विप्मेंट ब्रॅन्ड आयएमटी, ची देखील मालकी २०१८ मधे मिळविली. याशिवाय टॅफ़ेने भारतीय इंटिरियर उद्योगातील फ़ोरविया समूहाचा फ़्यूरेशिया – फ़्रेन्च ग्लोबल ऑटोमोटिव सप्लायरची देखील २०२२ मध्ये मालकी मिळविली.
टॅफ़ेने आपल्या उत्पादनांचा श्रेणींमुळे ग्राहकांचा विश्वास संपन्न केला आहे. ही उत्पादने उत्तम गुणवत्ता आणि काम करण्यात कमी खर्चाची मानली जातात. पारंपारिक कला जोपाण्यासह टॅफ़ेचे सामाजिक ध्येय हे शेतीय, शिक्षण, आरोग्य सेवा, सामाजिक विकास, आपत्कालीन मदत, संवर्धन आणि वनवासी विकासचे राहिले आहे.
भारत बनला ‘Micro-Transaction’ Economy! 2025 मध्ये केले UPI द्वारे 228 अब्ज व्यवहार






