Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Great Nicobar Project: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ८१ हजार कोटींच्या ग्रेट निकोबार प्रकल्पाला मान्यता

ग्रेट निकोबार महाप्रकल्प भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्‌या महत्वाचा आणि आवश्यक आहे. यामुळे हिंद महासागरात भारताचे स्थान आणखी मजबूत होईल, ग्रेट निकोबार बेट मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या अगदी जवळ आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 18, 2026 | 04:17 PM
Great Nicobar Project: राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडून ८१ हजार कोटींच्या ग्रेट निकोबार प्रकल्पाला मान्यता
Follow Us
Close
Follow Us:
  •  राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (NGT) ग्रेट निकोबार बेटावरील ८१,००० कोटी रुपयांच्या मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पाला अधिकृत मान्यता
  • हा प्रकल्प भारतासाठी लष्करी आणि व्यापारी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मलाक्का सामुद्रधुनीजवळ असल्याने जागतिक पुरवठा साखळीत भारताचा वाटा
  • १६६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या प्रकल्पासाठी सुमारे १० लाख झाडे तोडण्यात येणार असून १३० चौरस किलोमीटर वनजमीन वापरली जाणार
 

National Green Tribunal: ८१,००० कोटी रुपयांच्या ग्रेट निकोबार मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) च्या सहा सदस्यांच्या विशेष खंडपीठाने सोमवारी मान्यता दिली. प्रकल्पाला दिलेल्या पर्यावरणीय मंजुरीमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी त्यांना कोणताही ‘चांगला आधार’ सापडला नसल्याचे स्पष्ट करत प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीमध्ये ‘पुरेसे संरक्षण’ होते, असे एनजीटीने आपल्या निर्णयात म्हटले आहे. एनजीटीच्या २०२३ च्या आदेशानुसार ‘प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व’ आणि प्रकल्पाच्या पर्यावरणीय मंजुरीचा पुनर्विचार करण्यासाठी स्थापन केलेल्या हायपॉवर समितीने संबोधित केलेल्या मुद्द्यांवरही एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती प्रकाश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने लक्ष केंद्रित केले.

आम आदमी पक्षाच्या सभेतच DGP, मुख्य सचिवांचे भाषण; शासकीय नियमांचे उल्लंघन?

ग्रेट निकोबार महाप्रकल्प भारतासाठी धोरणात्मकदृष्ट्‌या महत्वाचा आणि आवश्यक आहे. यामुळे हिंद महासागरात भारताचे स्थान आणखी मजबूत होईल, ग्रेट निकोबार बेट मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या अगदी जवळ आहे. शिवाय, ते जगातील सर्वात व्यस्त सागरी व्यापार मागपैिकी एक आहे. म्हणूनच, हे स्थान भारताला जागतिक पुरवठा साखळीत एक महत्त्वाचा भाग बनण्यास सक्षम करेल, हे स्थान भारताच्या लष्करी तैनातीसाठी महत्त्वपूर्ण आहे, ज्यामुळे ते हिंदी महासागरात चिनी जहाजे आणि पाणबुड्यांवर बारीक लक्ष ठेवू शकेल. कोणत्याही आपत्ती किया युद्धाच्या वेळी हे स्थान भारताला केवळ प्रचंड ताकद प्रदान करेल, शत्रूवर लक्ष ठेवण्यात आणि हल्ला करण्यात देखील महत्त्वपूर्ण मदत करेल.

प्रकल्पाचे धोरणात्मक महत्त्व मोठे

न्यायाधीश श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील विशेष खंडपीठात न्यायिक सदस्य न्यायमूर्ती दिनेश कुमार सिह आणि न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी आणि तज्ञ सदस्य ए. संथिल वेल, अफरोज अहमद आणि ईश्वर सिंग याचा समावेश होता. खंडपीठाने असे म्हटले की प्रकल्पाचे धोरणात्मक महत्व नाकारता येत नाहीं किया आयलंड कोस्टाल रेग्युलेशन झोन (आयसीआरझेड) अधिसूचनेच्या अटीकडे दुर्लक्ष करता येत नाही. यामुळे हा मुद्दा संतुलित दृष्टिकोन आवश्यक असलेला माणून माडला गेला, सरकारने अटीचे पालन केले पाहिजे.

१० लाख झाडे तोडणार

१६६ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेल्या या मैगा प्रकल्पात १३० चौरस किलोमीटर वनजमिनीचे वळण आणि अंदाजे १० लाख झाडे तोडण्यात आली आहेत. या मेगा प्रोजेक्ट अंतर्गत ट्रान्सशिपमेंट पोर्ट, एकात्मिक टाउनशिप, नागरी आणि लष्करी विमानतळ आणि ४५०-एमव्हीए गैस आणि सौर ऊर्जा प्रकल्प बांधण्याचा सरकारचा मानस आहे. निकोबारी समुदायाच्या त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीमधून (ज्या २००४ च्या त्सुनामीने उद्धवस्त झाल्या होत्या) बेदखल होण्याबद्दल आणि पर्यावरणीय नुकसानीबद्दलच्या चिलेच्या पाश्र्वभूमीवर केंद्राने हा प्रकल्प पुढे नेला आहे.

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमधील निवडणुका होणार एप्रिलमध्ये; आसाममध्ये…

समुद्री जीवांना मिळणार संरक्षण

एनजीटीने असे नमूद केले की लेदरबैंक समुद्री कासव, निकोबार मेगापोड, खाऱ्या पाण्यातील मगर, रॉबर खेकडा, निकोबार मेंकाक आणि ग्रेट निकोबार बेटावरील इतर स्थानिक पक्षी प्रजातीचे संरक्षण करण्यासाठी विशिष्ट अटी निश्चित करण्यात आल्या आहेत, न्यायाधिकरणाने म्हटले आहे की सरकार पर्यावरणीय मंजुरीच्या अटींना बांधील आहे. बेटाच्या किना-यांचे संरक्षण केले जाईल जेणेकरून वाळूच्या किनाऱ्यांना हानी पोहोचणार नाही, कारण है किनारे बेटांचे संरक्षण करण्याव्यतिरिक्त, कासव आणि पक्ष्यांसाठी घरटे बांधण्याचे निवासस्थान देखील प्रदान करतात, असेही आदेशात म्हटले आहे.

 

Web Title: Great nicobar project national green tribunal approves rs 81000 crore great nicobar project

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • andman and nicobar
  • Development Plan
  • national news

संबंधित बातम्या

Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात! मग जुन्या मंदिराचे काय होणार?  नृपेंद्र मिश्रांनी दिले उत्तर
1

Ayodhya Ram Mandir: नव्या राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात! मग जुन्या मंदिराचे काय होणार?  नृपेंद्र मिश्रांनी दिले उत्तर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
3

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
4

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.