Photo Credit- Social media
हरियाणा: हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी एका महिन्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. सर्वच पक्ष आपापल्या विजयासाठी विविध योजना आखत आहेत. युतीपासून प्रचारापर्यंत प्रत्येक ठिकाणी सर्वजण जोमाने प्रयत्न करताना दिसत आहेत. अशात काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना हरियाणात आम आदमी पार्टीसोबत युती करायची आहे. हरियाणाबाबत काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत राहुल गांधीनी आपसोबत युतीच्या शक्यतांबाबत राज्यातील नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
हेदेखील वाचा: इंस्टाग्रामवरील अॅडमधून शॉपिंग करताय? लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
हरियाणात आम आदमी पक्षासोबत युती करण्यासंबंधी राहुल गांधी विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने आम आदमी पक्षाला एक जागा दिली होती. पण त्यानंतर विधानसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची युती होणार का, यासंदर्भात काँग्रेसने चाचपणी करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान, सोमवारी (2 सप्टेंबर 2024) हरियाणा येथे काँग्रेस निवडणूक समितीच्या बैठकीत, राहुल यांनी युतीचा उल्लेख करून नवीन राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. पण हरियाणात युती कऱण्यासंबंधीचा निर्णय हरियाणातील नेत्यांवरच सोडल आहे.
हेदेखील वाचा:फलटणमध्ये ‘हनीट्रॅप’चा पर्दाफाश; एका महिलेसह 7 जणांना अटक
हरियाणात काँग्रेस आणि आम आदमी पतक्षाच्या युतीलाच्या प्रस्तावाला काँग्रेसच्या वरिष्ठांनी मात्र नकार दिल्याची माहिती आहे.काही दिवसांपूर्वी हरियाणातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार कुमारी शैलजा यांनी एका मुलाखतीत आपसोबत युतीची शक्यता स्पष्टपणे नाकारली होती. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही हरियाणामध्ये काँग्रेससोबत युती करण्यास अनेकदा नकार दिला आहे.