उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा (फोटो- istockphoto)
नवी दिल्ली: मान्सूनचे आगमन संपूर्ण देशात झाले आहे. मात्र दिल्लीकरांना अजूनही पावसाची प्रतीक्षा होती. अखेर राजधानी दिल्लीत देखील पावसाचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाने मान्सून संपूर्ण भारतात दाखल झाला असल्याचे सांगितले आहे. दरम्यान हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, गुजरात आणि अन्य राज्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.
काल दिल्ली शहरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे दिललीवासीयांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. अनेक राज्यात मुसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी 8 ते 10 जुलैच्या दरम्यान मान्सून संपूर्ण भारतात दाखल होतो. मात्र यंदा काही दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उत्तराखंडमध्ये पावसाचा रेड अलर्ट
देवभूमी उत्तराखंडमध्ये तर पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, रूद्रप्रयाग, उत्तरकशी, डेहराडून, हरिद्वार, नैनीताल या जिल्ह्यांत आज दिवसभरात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिमला हवामान विभगाने या जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तराखंड राजुयत मान्सून दाखलजल्यापासून विविध घटनांमध्ये आतापर्यंत 20 नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये शाळांना सुट्टी जाहीर
हिमाचल प्रदेशमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्र्यांनी याबाबत घोषणा केली आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान , दक्षिण भारतात केरळ, महाराष्ट्र राज्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.
Jharkhand News: महापुराच्या विळख्यात अडकली शाळा
गेले काही दिवस झारखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. सिंहभूम जिल्ह्यातील पंडरसोली गावात पूर आल्याने एका कसगी शाळेतील 162 विद्यार्थी अडकले होते. शाळा असलेल्या परिसरात अचानक पूर आल्याने ही घटना घडली.
शाळेत अचानक पुराचे पाणी शिरल्याने 162 विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग शाळेत अडकून पडला होता. या सर्वांनी संपरून रात्र शाळेच्या छतावर बसून काढली. अखेर पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांनी या सर्वांना सुखरूपपणे पुराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे.
मुसळधार पावसामुळे शाळा परिसरात पुराचे पाणी भरले होते. एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना होडी आणि दोर यांच्या मदतीने वाचवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील या बचावकार्यात मदत केली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग सुरक्षित असल्याचे समजते आहे.