झारखंडमध्ये महापुराने घातले थैमान (फोटो- istockphoto)
झारखंड: संपूर्ण देशभरात मान्सूनचे आगमन झाले आहे. देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. झारखंड राज्यात देखील दमदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. झारखंडमध्ये मुसळधार पावसामुळे शाळेतील 162 विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. दरम्यान त्यान सर्वांचे रेस्क्यू ऑपरेशन देखील करण्यात आल्याचे समजते आहे.
गेले काही दिवस झारखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जिल्ह्यात पूर आला आहे. सिंहभूम जिल्ह्यातील पंडरसोली गावात पूर आल्याने एका कसगी शाळेतील 162 विद्यार्थी अडकले होते. शाळा असलेल्या परिसरात अचानक पूर आल्याने ही घटना घडली.
शाळेत अचानक पुराचे पाणी शिरल्याने 162 विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग शाळेत अडकून पडला होता. या सर्वांनी संपरून रात्र शाळेच्या छतावर बसून काढली. अखेर पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकांनी या सर्वांना सुखरूपपणे पुराच्या पाण्यातून बाहेर काढले आहे.
मुसळधार पावसामुळे शाळा परिसरात पुराचे पाणी भरले होते. एनडीआरएफच्या पथकाच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांना होडी आणि दोर यांच्या मदतीने वाचवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील या बचावकार्यात मदत केली. सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व कर्मचारी वर्ग सुरक्षित असल्याचे समजते आहे.
झारखंडमध्ये सध्या मुसळधार पावसाने कहर केला आहे. अनेक जिल्ह्यांत महापूर आला आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन सरकार आणि स्थानिक प्रशासनाने केले आहे. शाळेत 162 विद्यार्थी अडकले होते. त्यांच्याबरोबर 2 ते 3 शिक्षक देखील पुरता अडकले होते. त्या सर्वांनी मदत येईपर्यंत शाळेच्या छतावर पूर्ण रात्र जागून काढली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासन यांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवून 162 विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पुराचा फटक बसला आहे तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.
उत्तराखंडपासून गंगेच्या मैदानी प्रदेशापर्यंत पावसाचा कहर
देशभरात दक्षिण-पश्चिम मान्सूनने अपेक्षेपेक्षा 9 दिवस आधीच जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतरित्या संपूर्ण देशभरात मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा केली आहे. ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे देशाच्या अनेक भागांत पूर आणि भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. उत्तर भारतात डोंगर ते मैदान आणि शहर ते गाव, सर्वच ठिकाणी अविरत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नद्या दुथडी भरून वाहत आहेत.