अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा (फोटो ani)
पंजाब व उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा जोर वाढला
राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा इशारा
गुजरातला देखील जोरदार पावसाचा अलर्ट
Rain Update: सप्टेंबर महिना सुरू झाला तरी अजूनही देशभरात मान्सून सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पंजाब, उत्तर प्रदेश राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज कोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे, ते जाणून घेऊयात.
पर्वतीय राज्यांमध्ये म्हणजेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीरमध्ये स्थिती गंभीर झाली आहे. दरम्यान आज हवामान विभागाने दक्षिण पश्चिम राजस्थान, गुजरात उत्तर भागात मुसळधार पावसाचा अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
राजधानी दिल्लीत आज वातावरणात बदल पाहायला मिळू शकतो. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. उद्या व परवा दिल्लीत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये कसे असणार हवामान?
हवामान विभागाने आज उत्तराखंडमध्ये सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, चामोली, नैनिताल या जिल्ह्यांमध्ये अती मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान गुजरात, पंजाब, दक्षिण भारतातील अनेक राज्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, तेलंगणा, पूर्वेकडील राज्यात तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात देखील आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
पंजाबमध्ये मुसळधार
गेल्या काही दिवसांमधून पंजाब राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पंजाबमध्ये पुरामुळे आतापर्यंत ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन लाखांपेक्षा जास्त नागरिक प्रभावित झाले आहेत.
दरम्यान मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, गुजरात, महाराष्ट्र पूर्वेकडील राज्य, दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंजाबमध्ये अनेक भागात पुर आला आहे. हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे.
IMD Rain Alert: कुठे दिलासा तर कुठे संकट! आज पाऊस ‘या’ राज्यांना धुवून काढणार, पहा IMD चा अलर्ट
उत्तर भारतातील अनेक धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे अनेक भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. एनडीआरएफ, स्थानिक प्रशासन बचाव कार्य करत आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुरबाधित राज्यांचा दौरा करणार आहेत.