In Raigad A Hindu Girl Became A Victim Of Love Jihad The Victims Family Alleges That The Girl Was Killed By Taking Abortion Pills Nrab
रायगडमध्ये हिंदू तरुणी बनली लव्ह जिहादचा बळी? मुलीला गर्भपाताचे औषध पाजून मारल्याचा पीडिताच्या कुटूंबियांची आरोप
छत्तीसगडमधील रायगडमध्ये एका मुलीच्या मृत्यूवरून खळबळ उडाली आहे. मुलगी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. बहिणीच्या मृत्यूनंतर भावाने हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगितले आहे. त्याने बहिणीच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्ष एसआयटी चौकशीची मागणी करत आहे.
रायगड : छत्तीसगडमधील रायगडमध्ये एका मुलीच्या मृत्यूवरून खळबळ उडाली आहे. मुलगी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होती. बहिणीच्या मृत्यूनंतर भावाने हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगितले आहे. त्याने बहिणीच्या प्रियकरावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, भारतीय जनता पक्ष एसआयटी चौकशीची मागणी करत आहे.
मुलगी रायगड येथील आंबेडकर वसाहतीत राहायची. इंदिरा नगर येथील रहिवासी दानिश खान याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. ती लिव्ह इनमध्ये राहत होती. यादरम्यान ती गरोदर राहिली. दानिशने मुलीला गर्भपाताचे औषध पाजल्याचा आरोप आहे. हे औषध घेतल्यानंतर तिची प्रकृती ढासळू लागली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे 8 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
नातेवाइकांनी गंभीर आरोप केले
मुस्लिम तरुणाने आपल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले, असा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला आहे. यानंतर तब्बल चार वर्षे तिचे शारीरिक शोषण करून अखेर तिला मृत्यूच्या स्वाधीन केले. कट रचून गर्भपात करण्यासाठी तिला हेवी डोसची औषधे दिली गेली. यामुळे तिचा मृत्यू झाला, असे त्यांचे म्हणणे आहे.
एसआयटी चौकशी व्हावी : भाजप
त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने थेट लव्ह जिहादचा मुद्दा मांडला आहे. द केरळ स्टोरीप्रमाणेच छत्तीसगडच्या रायगडमध्ये लव्ह जिहादचे हे प्रकरण समोर आल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. दानिश खान याने 4 वर्षे मुलीवर विविध प्रकारे अत्याचार केले, असे भाजपचे म्हणणे आहे. याच काळात पीडितेने मुलालाही जन्म दिला, मात्र दानिशने ते मूल गायब केल्याचा आरोप भाजपने केला आहे. ती दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यावर तिला मूल होऊ नये यासाठी औषधांचा ओव्हरडोज देण्यात आला.भाजपचे प्रदेश सरचिटणीस ओ.पी.चौधरी यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी व्हावी. कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्यात यावे अशी मागणी केली
Web Title: In raigad a hindu girl became a victim of love jihad the victims family alleges that the girl was killed by taking abortion pills nrab