देशात गेल्या काही दिवसापासून कोरोना (Corona Patients) रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. तर आता देशात सणीसुदीचे दिवस असून कोरोना रुग्ण वाढण्याचाही धोका आहेत. अशा परिस्थितीत देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याच पाहायला मिळत आहे. देशात गेल्या 24 तासांत म्हणजेच शनिवारी दिवसभरात 6 हजार 809 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
[read_also content=”झलक दिखला जा च्या स्टेजवर चंद्राच्या नृत्याची जादू तर, गश्मीरचा हॉट अॅण्ड सिझलिंग ॲक्ट! https://www.navarashtra.com/movies/amruta-khanwilkar-and-gashmeer-mahajani-performance-in-jhalak-dikhla-ja-episode-1-nrps-322320.html”]
शुक्रवारी दिवसभरात 7 हजार 219 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती आणि शनिवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या तुलनेत त्यामध्ये 410 रुग्णांची घट झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा घट झाल्याने नागरिकांसाठी ही नक्की दिलासादायक बातमी आहे. तर, देशात सध्या 55 हजार 114 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासात 8 हजार 414 रुग्णांनी कोरोनातून बरे झाले. सध्या देशातील सक्रिय रुग्णांचे प्रमाण 98.69 टक्के एवढं झालं आहे.
राज्यात गेल्या 24 तासांत 1272 कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी दिवसभरात एकूण 1771 रुग्णांना डिस्जार्ज मिळालाय. कोरोतून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 78,46,694 वर पोहोचली आहे.
[read_also content=”दगडूशेठ हलवाई गणपतीची तृतीयपंथीयांनी केली आरती https://www.navarashtra.com/photos/aarti-by-transgender-in-dagdusheth-halwai-ganpati-temple-nrsr-322164.html”]