Photo credit- Social Media India-Pakistan War: तर लाहोर भारतात असता...; नेमकं काय झालं होतं त्यावेळी, काय होता लाल बहादूर शास्त्रींचा प्लॅन?
तारीख २४ ऑगस्ट १९४७. मोहम्मद अली जिना यांना त्यांच्या सुट्ट्या काश्मीरमध्ये घालवायच्या होत्या. परंतु जम्मू आणि काश्मीरचे राजा हरि सिंह यांना या राजकीय गोंधळात मोहम्मद अली जिना यांनी काश्मीरमध्ये यावं, अशी त्यांची इच्छा नव्हती. म्हणूनच त्यांनी जिन्नांना त्यांच्या जम्मू-कश्मीरमध्ये येण्यास नकार दिला. हरि सिंह यांच्या या निर्णयामुळे आपला ( राष्ट्रपित्याचा) अपमान झाल्याची भावना निर्माण झाली यानंतर, पाकिस्तानने कोणत्याही किंमतीत ७५ टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या जम्मू आणि काश्मीरवर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केला.
स्वातंत्र्यानंतर अवघ्या महिनाभरातच म्हणजे सप्टेंबर १९४७ मध्ये पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर, हरि सिंह यांनी जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीनीकरण करण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर भारतीय सैन्याने कमांड घेतली आणि जेव्हा युद्धबंदीची घोषणा झाली तेव्हा ते पाकिस्तानी सैन्याला मागे ढकलत होते. ज्यावेळी युद्धबंदीची घोषणा झाली, तोपर्यंत जम्मू-कश्मीचे दोन भाग पडले होते. पीओकेची स्थापना झाली होती. दोन्ही देशांदरम्यान एक रेषा आखण्यात आली, ज्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ( LOC) म्हणतात.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सीमेवर तणाव निर्माण झाला आहे. पाचव्यांदा युद्ध होण्याची दाट शक्यता आहे. भारत-पाकिस्तान युद्धात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दखल दिल्यामुळे कश्मीरसाठी सुरू असलेले युद्ध थांबले, अन्यथा भारतीय सैन्य लाहोरपर्यंत पोहोचले असते आणि पाकिस्तान शास्त्रींकडे भीक मागत राहिला असता.
१९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर आणि त्यानंतर १९६४ मध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर, भारत कमकुवत झाल्याचे पाकिस्तानला वाटू लागले होते. याच कारणास्तव, १९६५ मध्ये पाकिस्तानी अध्यक्ष अयुब खान यांच्या मनात काश्मीर काबीज करण्याची इच्छा निर्माण झाली. भारत कमकुवत आहे, असा समज झाल्याने, पाकिस्तानने या संधीचा फायदा घेण्यासाठी ऑपरेशन जिब्राल्टरची योजना आखली. या कारवाईत सहभागी असलेल्या लोकांना दोन कामे देण्यात आली होती, पहिले काश्मिरी मुस्लिमांना भारताविरुद्ध भडकवणे आणि दुसरे भारतीय सैन्याच्या महत्त्वाच्या चौक्या ताब्यात घेणे. ५ ऑगस्ट १९६५ रोजी काश्मीरमध्ये घुसखोरी झाली, परंतु स्थानिक काश्मिरींनी दिलेल्या माहितीमुळे ही कारवाई अयशस्वी ठरली.
ऑपरेशन जिब्राल्टर केवळ अयशस्वी झाल्यामुळे पाकिस्तानचे वाईट हेतूही उघड झाले. प्रत्यक्षात, भारताने ऑपरेशन जिब्राल्टरमध्ये सहभागी असलेल्या चार अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले होते. ८ ऑगस्ट रोजी ऑल इंडिया रेडिओने त्या अटक केलेल्या अधिकाऱ्यांची मुलाखत प्रसारित केली. ज्या कारवाईची पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही माहिती नव्हती ती सार्वजनिक झाल्यावर पाकिस्तान संतापला. यानंतर पाकिस्तानने तोफांचा मारा सुरू केला. येथूनच १९६५ चे भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध सुरू झाले.
दोन युद्धे लढलेल्या भारतीय सैन्याने एक नवीन रणनीती आखली. काश्मीरवरील दबाव कमी करण्यासाठी आणि पाकिस्तानला त्याच्या जाळ्यात अडकवण्यासाठी भारताने लाहोरकडे मोर्चा उघडला. या संपूर्ण ऑपरेशनचा कोड वर्ड ‘बँगल’ होता. भारतीय सैन्याने चार मोर्चे उघडले आणि काही तासांतच डोगराईच्या उत्तरेकडील भसीन, दोगाइच आणि बाहग्रियान ताब्यात घेतले. डोगराई लाहोरपासून फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर आहे.
भारत-पाकिस्तान युद्धाच्या मध्यभागी, २३ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र संघात प्रवेश झाला. यानंतर युद्धबंदी जाहीर झाली आणि युद्ध संपले. धक्का बसला आणि अस्वस्थ होऊन, पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि म्हणाले, “मला हे समजले पाहिजे की पाकिस्तान ५० लाख काश्मिरींसाठी १० कोटी पाकिस्तानी लोकांचे जीवन कधीही धोक्यात घालणार नाही, कधीच नाही.” या युद्धानंतर ताश्कंद करारावर स्वाक्षरी झाली. भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे ताश्कंदमध्येच नाट्यमय निधन झाले. यानंतर, आयर्न लेडी इंदिरा गांधी यांनी भारताची सूत्रे हाती घेतली.