(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला नेहमीच काही ना काही घडताना दिसून येत असतं. इथे कधी स्टंट्स शेअर केले जातात तर कधी मजेदार जुगाड तर कधी हृदयद्रावक अपघातांचे दृश्य…यासोबतच इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात ज्यातून जंगलातील आयुष्य आपल्या जवळून पाहता येते. एकाला जगण्यासाठी दुसऱ्याचा बळी जाणे हा जंगलाचा नियम तर प्रत्येकालाच माहिती आहे. इथे बलाढ्य प्राणी नेहमीच कमकुवत आणि लहान प्राण्यांवर हल्ला करतात आणि त्यांच्या शिकारीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही होतात. आताही इथे असेच काहीसे झाले आहे मात्र यात शिकाऱ्याच्या डाव फेल झाल्याचे दृश्य दिसून आले आणि यानंतर पुढे जे घडले ते पाहणे रोमांचक होते.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक भलामोठा अजगर गुहेबाहेर विळखा घालत असल्याचे दिसून येतो. वास्तविक यात गुहेत एक मांजरीचं पिल्लू असतं ज्याची शिकार करण्याचा प्लॅन अजगराने बनवलेला असतो. तो दबक्या पावलांनी गुहेजवळ जातो आणि आत जाणार तितक्यात एक त्या पिल्लाची आई अजगारासमोर येते. त्याला पाहताच त्याचा हेतू ती जाणून घेते आणि त्याच्याकडे रागाने बघत त्याला तिथून पळवून लावण्याचा पर्यटन करते. ती आपल्या मुलांना वाचवण्यासाठी अजगराच्या विरोधात धैर्याने उभी राहते. हे दृश्य जंगलाच्या क्रूर राजवटीचे दर्शन घडवते, जिथे आईचे प्रेम कोणत्याही धोक्यापेक्षा मोठे असते.
मांजर अजगराला जोरात नखे मारून घाबरवण्याचा प्रयत्न करते. तिच्या तीक्ष्ण प्रतिक्षेपांमुळे ती स्वतःला आणि त्या छोट्या मांजरीला अजगराच्या तावडीतून वाचवण्याचा प्रयत्न करते. एवढ्यात मांजरीचं पिल्लू देखील बाहेर येतं आणि त्याला पाहताच अजगर त्याच्यावर जोरदार प्रहार करतो तो पिल्लाला गिळण्यासाठी आपले तोंड उघडतो, पिल्लू लगेच उंच उडी मारतो आणि इथेच व्हिडिओचा शेवट होतो. आता अजगराची ही शिकार यशस्वी झाली की फेल हे गूढ मात्र व्हिडिओत दाखवण्यात आलेलं नसून ते गुलदस्त्यातच राहते.
— Wildlife Uncensored (@TheeDarkCircle) May 2, 2025
शिकारीचा हा व्हिडिओ @TheeDarkCircle नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 मिलियनहुन आधिकचे व्युज मिळाले असून युजर्सच्या याच्या कमेंट सेक्शनमध्ये या शिकारीवर आले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “नक्की कोण जिंकलं?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मांजरीचा वेग अविश्वसनीय होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.