जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराला मोठे यश (फोटो- ani)
जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरच्या उधमपूर येथे भारतीय लष्कराला मोठे यश प्राप्त झाले आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपुर येथे भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आहे आहे. लष्कराचे ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला आहे.
भारतीय लष्कराच्या पथकाला या भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानुसार, भारतीय लष्कराच्या पथकाने आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ऑपरेशन राबवण्यास सुरुवात केली. उधमपुर परिसरात जैशचे चार ते पाच दहशतवादी लपले असल्याची माहिती प्राप्त होताच या परिसराला वेढा घालण्यात आला.
भारतीय लष्कराने आणि पोलिसांनी जम्मू काश्मीरच्या उधमपुरमध्ये ‘ऑपरेशन बिहाली’ सुरू केले होते. सर्च ऑपरेशन सुरू असतानाच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत एक दहशतवादी ठार मारण्यात लष्कराला यश आले आहे. सर्च ऑपरेशन जवळपास 6 तासांपासून सुरू आहे. ऑपरेशन अजूनही सुरूच आहे.
सुरक्षा यंत्रणांनी सोशल मिडियावर पोस्ट करत एक दहशतवादी ठार मारल्याबद्दल सांगितले आहे. वसंतगडमध्ये भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिस यांकच्या संयुक्त कारवाईत एका दहशतवाद्याला ठार मारले आहे.
Op BIHALI Update
In the ongoing joint operation by #IndianArmy & @JmuKmrPolice in #Basantgarh, one #terrorist has been neutralized till now.#Operation continues.@adgpi@NorthernComd_IA— White Knight Corps (@Whiteknight_IA) June 26, 2025
मोठी अपडेट! दहशतवादी लपले होते डोंगराच्या मागे
पहलगाम हल्लाप्रकरणात मोठी अपडेट समोय येत असून 22 एप्रिल रोजी केलेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांना जीव गमवावा लागला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मोठे यश मिळाले आहे. हत्याकांडाच्या दोन महिन्यांनंतर एनआयएने स्पष्ट केले की, या हल्ल्याला स्थानिक लोकांचा पाठिंबा होता. रविवारी (22 जून) एनआयएने पहलगाममधील दोन दहशतवाद्यांना मदतनीसांना अटक केली, ज्यांनी हल्ल्यापूर्वी तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना जेवण, निवास आणि रेकी करण्यात मदत केली होती, असा खुलासा NIA कडून करण्यात आला आहे.
पहलगाम हल्लाप्रकरणातील चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींनी कबूल केले की पर्यटकांना मारणारे तीन पाकिस्तानी दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे होते. दोघांची चौकशी अजूनही सुरू आहे. त्यांचे मोबाईल फोन आणि इतर उपकरणे तपासल्यानंतर, एनआयएला अनेक सुगावा सापडले आहेत. हल्ल्यानंतर, सुरक्षा यंत्रणांनी संशय व्यक्त केला होता की या हल्ल्याला स्थानिक लोक मदत करत आहेत. काश्मीर-केंद्रित पक्षांनी यावर बरेच राजकारणही केले होते.
दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगामपासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी २५ पर्यटक आणि एका स्थानिक घोडेस्वाराची हत्या केली. हल्ल्यानंतर दहशतवादी तेथून पळून गेले. सुरक्षा यंत्रणांनी दावा केला की, या हल्ल्यात पाच दहशतवादी सहभागी होते, त्यापैकी दोन स्थानिक होते आणि एक पाकिस्तानी होता. पहलगाम हल्ल्यानंतरच भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले.