अनंतनागमध्ये भारतीय लष्कराची मोठी कारवाई (फोटो- सोशल मिडिया)
श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत चांगलाच आक्रमक झाला आहे. अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी करण्यात आली आहे. भारतीय सैन्य दलांनी आक्रमण युद्धाभ्यास देखील सुरू केला आहे. तसेच अनंतनागमध्ये देखील लष्कराचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू आहे. याचवेळी लष्कराने एक मोठी कारवाई केली आहे.
पहलगाममध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कर मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन राबवत आहे. भारतीय सेना जम्मू काश्मीर पोलिस,, एनआयए अन्य तपास संस्थांसह ऑपरेशन राबवत आहे. याच दरम्यान अनंतनागमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अनंतनागमध्ये लष्कराने सर्च ऑपरेशन करताना तब्बल १७५ लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.
पहलगाम पाठोपाठ जम्मू काश्मीरच्या अन्य भागात देखील सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. सर्च ऑपरेशनमध्ये हेलिकॉप्टर, ड्रोनची मदत घेतली जात आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याची कसून चौकशी केली जात आहे. भारतीय वायुसेना, नौदल आणि लष्कर जोरदारपणे आक्रमण युद्धाभ्यास करत आहे. भारत आपल्यावर हल्ला करेल अशी चिंता पाकिस्तानला सतावत आहे.
जम्मू काश्मीरमधील ‘ते’ 14 दहशतवादी भारतीय सैन्याच्या रडारवर..
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दल या दहशतवाद्यांवर एकामागून एक मोठी कारवाई करत आहेत. एकामागून एक सर्वांची घरे जमीनदोस्त करण्यात आली. आजही पुलवामा आणि कुलगाममधील दहशतवाद्यांची घरेही आयईडी स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली. या सगळ्यात सुरक्षा यंत्रणांनी १४ दहशतवाद्यांची यादी तयार केली असून त्यांचा शोधही सुरू केला आहे.
नेव्ही, आर्मीने शत्रूला दिला ‘हा’ निर्वाणीचा इशारा
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानबाबत काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच भारताने राफेल, सुखोई या लढाऊ विमानांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. तर लष्कर आणि नौदल देखील पूर्ण तयारीत आहे. भारत काहीतरी मोठे करणार अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यातच आता भारतीय नौदल आणि लष्कराने एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवरुण पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
Pahalgam Terror Attack: आता पाकिस्तान संपणार! नेव्ही, आर्मीने शत्रूला दिला ‘हा’ निर्वाणीचा इशारा
भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला असताना भारतीय नौदलाने एक ट्वीट केले आहे. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक्सवर भारतीय नौदलाने Mission Ready, Anytime, Anywhere, Anyhow! अशा प्रकारची पोस्ट केली आहे. या पोस्टचे अनेक प्रकारचे अर्थ काढले जात आहेत. भारत पाकिस्तानविरुद्ध मोठे पाऊल उचलणार असे म्हटले जात आहे. तर कोणत्याही कारवाईसाठी भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना पूर्णपणे तयार असल्याचे म्हटले जात आहे.