नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची जगदंबा तलवार (Jagadamba Sword) ही गेल्या काही वर्षांपासून इंग्लंडमध्ये आहे. ही तलवार इंग्लंडमधून परत आणण्यासाठी आता सरकारकडून हालचाली सुरू केल्या जात आहेत. त्यानुसार, प्रयत्न देखील केले जात आहेत. यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी ही तलवार परत मिळवण्यासंदर्भात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी संपर्क साधणार असल्याचे म्हटले होते.
इंग्लंडकडे असलेली जगदंबा तलवार परत मिळवण्यासाठी सरकार आता प्रयत्न करणार आहे. या मागणीला खऱ्या अर्थाने जोर धरला जेव्हा भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rushi Sunak) काही दिवसांपूर्वीच ब्रिटनचे पंतप्रधान झाले. तेव्हापासून जगदंबा तलवार पुन्हा भारतात आणण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेली अशी ही जगदंबा तलवार आहे. ही तलवार देशाची अस्मिता आहे. ही तलवार कोल्हापूरचे चौथे शिवाजी महाराज यांनी 1875 मध्ये तत्कालीन ब्रिटिश युवराज प्रिन्स ऑफ वेल्स यांना भेट दिली होती. सध्या ही तलवार ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे.
तलवार परत मिळवण्याबाबत पत्रव्यवहार
जगदंबा ही तलवार भारतात परत आणण्यासाठी सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार, सांस्कृतिक विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे.
कशी आहे ही जगदंबा तलवार?
छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार असून, ही गेल्या काही वर्षांपासून इंग्लंडमध्ये आहे. जगदंबा तलवारीची लांबी 121 सेंटिमीटर म्हणजेच ही तलवार जवळपास 4 फूट आहे. तलवारीच्या रत्नजडीत मुठीवर संपूर्ण सोन्याचं काम आहे. तलवार दिसायला अत्यंत सुंदर असून वजनाने कमी असल्याचे सांगितले जात आहे.