Photo Credit : Social Media
नवी दिल्ली: भारतात २६ जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तानच्या घुसखोरीला आणि हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना देशाच्या शेकडो जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारतीय लष्कराने कारगिल युद्धातील सर्वात महत्त्वाचे शिखर टायगर हिल ४ जुलै रोजीच ताब्यात घेतले होते. पण असे असतानाही कारगिल विजय दिवस 26 जुलैलाच का साजरा केला जातो? याचे कारण तुम्हाला माहिती आहे का?
ब्रिगेडियर (निवृत्त) खुशाल ठाकूर हे कारगिल युद्धाचा एक भाग होते. युद्धाच्या वेळी ते 18 ग्रेनेडियर्समध्ये कर्नल पदावर कार्यरत होते. कारगिलचे महत्त्वाचे शिखर टायगर हिल केवळ 18 ग्रेनेडियर्सनी काबीज केले होते. खुशाल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर हिलच्या विजयानंतर नवाझ शरीफ घाबरून अमेरिकेत गेले आणि त्यांनी युद्धविरामाची चर्चा सुरू केली पण तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी म्हणाले – “जोपर्यंत आम्ही प्रत्येक सीमेवरून या पाकिस्तानींना बाहेर काढत नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही.” त्यानंतर भारतीय लष्कराने 26 जुलैपर्यंत भारतीय सीमेवरून पाकिस्तानच्या सर्व घुसखोरांना हुसकावून लावले. यामुळेच २६ जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.
खुशाल ठाकूर तेव्हा भारतीय लष्करात कर्नल पदावर होते. होते. खुशाल ठाकूर सांगतात की, “12 आणि 13 जून 1999 रोजी आम्ही टोलोलिंग शिखर ताब्यात घेतले आणि हा या युद्धातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होता. यामुळे आमच्या सशस्त्र दलांचे आणि देशवासीयांचे मनोबलही वाढले. पण पाकिस्तानचे मनोधैर्य खचले होते. आम्ही एकामागून एक शिखर काबीज करत होते. पुढचे सर्वात महत्त्वाचे शिखर होते ते टायगर हिल.”
“टायगर हिलसाठी जिंकण्यासाठी माझ्या पुरेसा वेळ होता. माझ्याकडे तोफखाना, मल्टी-बॅरल रॉकेट लाँचर्स आणि उच्च उंचीवर चालणारी युद्धसामुग्री होती. सर्व नुकसान होऊनही, 18 ग्रेनेडियर्सचे जवान शत्रुशी भिडले आणि आम्ही टायगर हिलवर कब्जा केला. टायगर हिल ताब्यात येताच आम्ही तिथे भारताचा ध्वज फडकवला.
ब्रिगेडियर (निवृत्त) खुशाल ठाकूर सांगतात, त्यावेळी टीव्ही चॅनेल्स फारसे नव्हते, पण टायगर हिलवर विजय साजरा करताना भारतीय जवानांची छायाचित्रे त्यांच्या शौर्याचे प्रतीक बनली. टोलोलिंग आणि टायगर हिलची लढाई ही निर्णायक लढाई होती.
“सुरुवातीला, आम्ही टोलोलिंग ताब्यात घेतले. टोलोलिंग हे NH-1 अल्फापासून अगदी जवळ म्हणजे अगदी 3 किमी अंतरावर आहे. टायगर हिलच्या बाबतीतही असेच आहे,NH-1 अल्फा पासून टायगर हिल अगदी 8-10 किलोमीटर आहे. टायगर हिलवरून NH-1 अल्फा अगदी स्पष्टपणे दिसून येते. तुम्ही या रस्त्यावर कोणतीही हालचाल करू शकत नाही.
“घुसखोरांकडे टोलोलिंग आणि टायगर हिल येथे सर्व प्रकारची शस्त्रे, स्वयंचलित, विमानविरोधी तोफा आणि इतर क्षेपणास्त्रे होती आणि दोन्ही ताब्यात घेणे अत्यंत आवश्यक होते, हे शिखर ताब्यात आल्यानंतर सीमाभागातील सर्व घुसखोरांनाही भारतीय लष्कराने पिटाळून लावले, यासाठी 26 जुलैपर्यंतचा कालावधी लागला. त्यामुळेच 26 जुलै रोजी कारगिल विजयाला 25 वर्षे पूर्ण होतात.