आजपर्यंतच्या भाजपच्या सर्व राष्ट्रीय अध्यक्षांची यादी समोर आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
BJP National President : नवी दिल्ली : सर्वात जास्त कार्यकर्त्यांची संख्या असलेला आणि लोकप्रिय असलेल्या भाजप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. नितीन नबीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी (BJP national president) निवड झाली आहे. पक्षाच्या मुख्यालयात भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ. के. लक्ष्मण यांनी नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यांना माळ घालून त्यांचे अभिनंदन केले. नितीन नबीन यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे.
नितीन नबीन यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकी एक प्रमुख कारण जनरल झेड म्हणजेच तरुण मतदार आहेत. नितीन नबीन हे भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले नबीन हे ४५ वर्षांचे आहेत. दरम्यान, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे ८३ वर्षांचे आहेत. त्यांच्या माध्यमातून भाजप पक्षाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जाते. यापूर्वी अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपचा कारभार सांभाळला आहे.
हे देखील वाचा : नितीन नबीन हे माझे नवीन बॉस..! भाजप संघटन पर्वामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वक्तव्य
अटलबिहारी वाजपेयींपासून नितीन नबीनपर्यंत…
भाजप राष्ट्रीय अध्यक्षांबद्दल बोलायचे झाले तर, भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी होते. त्यांच्यानंतर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि जेपी नड्डा यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली. आता, नितीन नवीन यांना सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यामुळे पक्षाच्या नेतृत्वातील एका नवीन अध्यायाची सुरुवात होते. अटलबिहारी वाजपेयींपासून नितीन नवीनपर्यंत पक्षाचे अध्यक्ष कोण होते आणि कोणत्या वयात होते ते आपण जाणून घेऊया…
कोण आहेत नितीन नबीन?
नितीन नबीन यांचा जन्म २३ मे १९८० रोजी झारखंडमधील रांची येथे झाला. त्यांचे वडील नवीन किशोर प्रसाद सिन्हा हे देखील आमदार होते आणि जेपी चळवळीशी संबंधित होते. ते भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. वडिलांच्या निधनानंतर नितीन यांनी राजकारणात प्रवेश केला. २००६ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर, ते बांकीपूरमधून निवडणूक जिंकत राहिले. २०१०, २०१५, २०२० आणि २०२५ मध्ये ते बांकीपूर येथून सलग विजयी झाले. त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस अशी पदेही भूषवली आहेत.






