संग्रहित फोटो
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तणाव वाढताना दिसत आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्लेही केले जात आहेत. त्यात आता एटीएम मशिन्समध्ये पैशांचा तुटवडा असल्याच्या काही अफवा येत आहेत. त्यावर बँकांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘एटीएम पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पुरेशी रोकड आहे आणि डिजिटल सेवा सुरळीत सुरू आहेत’, असे बँकांनी म्हटले आहे.
‘स्टेट बँक ऑफ इंडिया’, ‘पंजाब नॅशनल बँक’ आणि इतर अनेक बँकांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. या बँकांनी त्यांचे एटीएम पूर्णपणे कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पुरेशी रोकड आहे आणि डिजिटल सेवा सुरळीत सुरू आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत एटीएम बंद केले जाऊ शकतात, असा दावा सोशल मीडियावर येत असलेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन जारी करण्यात आले आहे. बँकांनी असेही म्हटले आहे की, त्यांच्या सर्व डिजिटल सेवा सुरळीत सुरू आहेत’.
— State Bank of India (@TheOfficialSBI) May 9, 2025
भारतातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, ‘आमचे सर्व एटीएम, सीडीएम/एडीडब्ल्यूएम आणि डिजिटल सेवा पूर्णपणे कार्यरत आहेत आणि जनतेसाठी उपलब्ध आहेत. भारतातील सर्वात मोठ्या कर्ज देणाऱ्या बँकेने आपल्या ग्राहकांना अफवांवर विश्वास ठेवू नका’, असा सल्ला दिला आहे.
Imparting seamless ATM & Digital Banking services.@FinMinIndia @DFS_India #ImportantAnnouncement #DigitalBanking #ATMServices #BankingServices #PNB pic.twitter.com/xQoUW18eUy
— Punjab National Bank (@pnbindia) May 9, 2025
अनेक बँकांकडून मेसेज जारी
बँक ऑफ बडोदा, पंजाब अँड सिंध बँक, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया यांनीही असेच संदेश जारी केले. पंजाब नॅशनल बँकेने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, आमच्या सर्व डिजिटल सेवादेखील सुरळीत सुरू आहेत.