मान्सूनची (Monsoon Update) आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनची प्रतीक्षा आता संपली आहे. भारतीय हवामान खात्याने मान्सून केरळमध्ये (Monsoon In Kerala) दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक आठवडा उशीराने का होईना पण मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील जनतेसोबतच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. (Weather Update)
[read_also content=”ऑफिस आहे की कोंडवाडा? ‘या’ कंपनीत चक्क कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये कोंडून वॉचमनने बाहेरून लावलं टाळं,पाहा Video https://www.navarashtra.com/viral/company-locked-office-while-employee-present-in-the-office-viral-video-nrsr-412749.html”]
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, “नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून पाऊस पडत आहे. दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचं आगमन होण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागला. मान्सूनने केरळमध्ये दाखल होण्यासाठी 8 जूनची तारीख गाठली. आता कालांतराने मान्सून पुढे सरकत जाईल आणि सक्रीय होईल.
Monsoon reaches Indian mainland, IMD declares onset over Kerala
— Press Trust of India (@PTI_News) June 8, 2023
मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल. मान्सून तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच दाखल होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची सगळेजण वाट बघतायत.
दरम्यान, यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनवर खूप परिणाम झाला. या चक्रीवादळाच्या परिणामामुळेच मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी उशीर होत असल्याचं हवामान खात्याने सांगितलं होतं. आता मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.
तीन आठवड्यांत निर्माण होणारे दुसरे चक्रीवादळ
उत्तर हिंदी महासागरात तीन आठवड्यांत निर्माण होणारे बिपरजॉय हे दुसरे चक्रीवादळ असेल. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने बांगलादेश आणि म्यानमारमध्ये प्रचंड नुकसान झाले होते.
मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा
अरबी समुद्रात खोलवर बिपरजॉय चक्रीवादळ तयार होत असल्याने कोकण किनारपट्टीवर याचा फारसा परिणाम होणार नाही. तसंच, चक्रीवादळामुळे येणाऱ्या पावसाचीही शक्यता नाही. मात्र, मच्छिमार बांधवांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना मच्छीमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसंच, “8, 9, 10 जून रोजी कर्नाटकात गोवा-महाराष्ट्राचा किनारपट्टीच्या भागात वादळी वाऱ्याचा वेग 40-50 KMPH असण्याची शक्यता आहे. या काळात नैऋत्य अरबी समुद्र, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला असण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये”, असं ट्वीट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी केलं आहे.