हरियाणा : हरियाणातून (Haryana) एक मोठी बातमी समोर येत आहे. अंबाला येथे एकाच कुटुंबातील 6 जणांचा संशयास्पद मृत्यू झाला (Suspicious death)आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.
[read_also content=”मोठी बातमी! देशात ‘या’ तारखेपासून सुरु होणार 5G सेवा https://www.navarashtra.com/india/5g-internet-service-to-start-in-the-country-from-october-in-nrps-319523.html”]
हरियाणातील अंबाला येथे एकाच कुटुंबातील 6 जण लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. मृतांमध्ये पती पत्नीसह दोन मुलं तसेच वृध्द आई-वडीलांचा समावेश आहे. मृतक सुखविंदर एका खासगी कंपनीचे व्यवस्थापक असल्याची माहिती समोर येत आहे. आज सुखविंदर सिंह यांच्या मुलीचा वाढदिवस असल्याचे सांगण्यात येत आहे. आत्महत्या की घातपात याचा पोलीस तपास करत आहेत.