भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, 1950 मध्ये या दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता. नवी दिल्लीतील वार्षिक प्रजासत्ताक दिन परेड कर्तव्य पथ येथे आयोजित करण्यात आली होती. यंदा ही परेड महिला-केंद्रित होती, ज्यात ‘विक्षित भारत’ आणि ‘भारत-लोकतंत्र की मातृका’ हे मुख्य विषय होते. प्रथमच, सर्व महिलांच्या त्रि-सेवा दलाने परेडमध्ये भाग घेतला, ज्यात भारतीय लष्कराच्या लष्करी पोलिसांच्या महिला तुकड्यांसह इतर दोन सेवांमधील महिलांचा समावेश होता.
महिला वैमानिकांनी ‘नारी शक्ती’चे केले प्रतिनिधित्व
भारतीय लष्कराच्या लष्करी पोलिसांच्या महिला तुकड्यांसह इतर दोन सेवांमधील महिलांचा समावेश
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे प्रजासत्ताक दिन परेड 2024 मध्ये प्रमुख पाहुणे
CRPF, BSF आणि SSB च्या महिला कर्मचाऱ्यांनी मोटरसायकल प्रदर्शनादरम्यान धाडसी स्टंट करून देशाच्या नारी शक्तीचे केले प्रदर्शन
‘आवाहन’ नावाच्या बँड परफॉर्मन्समध्ये 100 हून अधिक महिला कलाकारांनी विविध प्रकारची वाजवली तालवाद्ये