फोटो- सोशल मिडिया
केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान हे १८ सप्टेंबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिले मतदान हे १८ सप्टेंबर, २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबर रोजी होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये एकूण ९० विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तसेच निवडणुकीचे निकाल ४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहेत. दरम्यान या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेस यांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांनी भाष्य केले आहे.
काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. यावेळी फारुख अब्दुल्ला म्हणाले, ”काँग्रेसबरोबर जागावाटप करून भाजपला पराभूत करण्यासाठी तसेच लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थिर सरकार स्थापन करण्यास तयार आहोत.” काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्ष जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी ५१-३२ अशा जागा लढणार आहेत.
पुलवामा जिल्ह्यातील अवंतिपुरायेथे माध्यमांशी बोलताना फारुख अब्दुल्ला म्हणाले, ”युतीमध्ये एकत्रित आल्यावर अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. काही जागा मिळविण्यासाठी काही जागा सोडाव्या लागतात. देवाच्या कृपेने युती सफल झाली आणि सरकार आल्यास आम्ही लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू.” त्यानंतर ओमर अब्दुल्ला म्हणाले, ”काँग्रेससोबत जागावाटप पूर्ण झाले आहे. युती करण्याचे कारण भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांना पराभूत करणे हे आहे.”
दरम्यान, आगामी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज मंगळवारी (दि.29) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामुळे काही इच्छुकांमध्ये जल्लोष तर काही इच्छुकांना संधी न मिळाल्यामुळे नाराजी आहे. भाजपने जाहीर केलेल्या या तिसऱ्या यादीमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 10 आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 19 उमेदवारांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका 18, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत होणार आहेत. तसेच मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.