Rahul Gandhi On UPI Charges: सरकारची अमेरिकेसमोर शरणागती !; UPI वर शुल्कावरून राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
UPI पेमेंटवरील शुल्कावरून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी इंदिरा गांधींचा फोटो शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “राहुल गांधी यांनी यूपीआय पेमेंटवरील प्रस्तावित एमडीआर कर सरकारने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे. सरकारने अमेरिकेपुढे शरणागती पत्करली आहे आणि अमेरिकेला प्रचंड नफा कमावण्याची संधी दिली आहे. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपासून ₹२,००० पेक्षा जास्त रकमेच्या यूपीआय पेमेंटवर ०.४% शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. मात्र, हे शुल्क ग्राहकाला नाही, तर कंपनी किंवा दुकानाला भरावे लागणार आहे.
Disha Salian Case Latest News: दिशा सालीयन प्रकरणाची सुत्रे आता बड्या महिला अधिकाऱ्याकडे
राहुल गांधी यांनी बुधवारी (१६ सप्टेंबर, २०२६) ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी यूपीआय करावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “इंदिराजींना एकदा विचारण्यात आले होते की त्यांचा कल डाव्या की उजव्या कोणत्या बाजूला जास्त आहे. त्यावर इंदिराजींनी उत्तर दिले होते की, त्यांचा कोणत्याही बाजूकडे कल नाही; त्यांची विचारसरणी पूर्णपणे सरळ होती.”
राहुल गांधी म्हणाले की,”पण मोदीजींची संकल्पना वेगळी आहे. ते डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचे नाहीत. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर शरणागती पत्करली आहे. यूपीआय कर लादून आणि अमेरिकेला मोठी रक्कम देऊन, त्यांनी भारतातील प्रत्येक नागरिकावर कर लादला आहे. “मोदीजी, अमेरिकेपुढे झुकणे थांबवा. हिंमत दाखवा, उभे राहा आणि यूपीआय कर रद्द करा.” असे आवाहनही राहुल गांधी यांनी केलं आहे.
Manoj Jarange Patil Ahilyanagar Visit : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; आज श्रीगोंद्यात मुक्काम!






