सौजन्य : nayab-singh-saini
चंदीगड : हरियाणा विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, आता नायब सिंह सैनी हे पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहे. त्यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज दुपारी पार पडला. सैनी यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते.
पंचकुला येथील दशहरा मैदानात हा शपथविधीचा कार्यक्रम झाला. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह संरक्षणमंत्री राजनाथसिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. याशिवाय, भाजपाशासित राज्यांचे अनेक मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. यावेळी मुख्यमंत्री सैनी यांच्यासह 13 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला सुमारे 50 हजार जणांची उपस्थिती असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या शपथविधी सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, राजनाथसिंह आणि भाजपच्या बड्या नेतृत्वासह पक्षाचे वरिष्ठ नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या नेत्यांना मिळाले मंत्रिमंडळात स्थान
राव नरबीर, गौरव गौतम, कृष्ण बेदी, अनिल विज, रणवीर गंगवा, शाम,राजेश नागर, कृष्ण लाल मिधा, श्रुती चौधरी, अनिल विज, अरविंद कुमार शर्मा, विपुल गोयल, निखिल मदान यांना हरियाणा सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याचे सांगितले जात आहे.