इराणमध्ये भूकंपाचे धक्के (फोटो- aigemini)
इराणमध्ये जाणवले तीव्र भूकंपाचे धक्के
हा भुकमप अणूचाचणी संबंधित असल्याच्या चर्चा
युद्ध सुरू अस्तनाच इराणवर दुहेरी संकट
इराणवर येणारी संकटे थांबण्याचे नाव घेताना दिसून येत नाहीयेत. आधीच अमेरिका आणि इस्त्रायल इराणवर भीषण हल्ले करत असतानाच आता इराणवर नैसर्गिक संकट असल्याचे समोर आले आहे. इराणमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. इराणच्या गेराश भागात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याचे समोर येत आहे. हा भूकंप नैसर्गिक नसून त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
इराणमध्ये झालेल्या भूकंपामुळे आधीच तणाव असलेल्या देशात राजकीय आणि लष्करी अनिश्चितता वाढली आहे. भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याने तेथील नेतृत्वाला दिलासा मिळाला आहे. अचानक झालेल्या भूकंपामुळे तेथील नागरिक भयभीत झाले आहेत.
सोशल मिडियावर अफवांना जोर
इराणमध्ये आलेला भूकंप हा त्याच्या अणूकार्यक्रमाशी सबंधित असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भातील अफवा सोशल मिडियावर वेगाने पसरत आहेत. इराणच्या अणूकार्यक्रमाच्या ठिकाणी हल्ले होत असल्याचे समोर येत आहे. मात्र तज्ञांनी या गोष्टीचे खंडन केले आहे.
ब्रम्होसपेक्षाही भयंकर इराणचे ‘हे’ ब्रम्हास्त्र, इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट; 20000 Kmph आहे वेग
इस्त्रायलचा होऊ शकतो नायनाट
अमेरिका आणि इस्रायलने अखेर इराणवर हल्ला केला आणि त्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण अरब जग आणि मध्य पूर्व युद्धाच्या ज्वाळांमध्ये बुडाले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर तेहरानने प्रत्युत्तर दिले आहे. इराणने इस्रायली शहरांवर तसेच सौदी अरेबिया, ओमान, युएई आणि बहरीन सारख्या देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत.
मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना विशेषतः लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. इराणकडे हजारो ड्रोन आणि मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे आहेत. यापैकी एक खोर्रमशहर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. ते चौथ्या पिढीचे क्षेपणास्त्र असल्याचे म्हटले जाते, ज्याला खैबर असेही म्हणतात. खोर्रमशहर-४ क्षेपणास्त्र अनेक प्रकारे ब्राह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रापेक्षाही धोकादायक आहे.
Iran Israel War: कुठे आहे इराणच्या सर्वोच्च नेत्याची Dead Body? ना फोटो ना बातमी! शेवटी नक्की कोणी पाहिले
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडच्या अखत्यारीत असलेल्या या स्ट्राइक ग्रुपमध्ये प्रगत हवाई संरक्षण प्रणालींनी सुसज्ज अनेक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकांचा समावेश आहे. हे विमानवाहू जहाज अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरसह विस्तृत हवाई आणि सागरी हल्ल्याची क्षमता प्रदान करते. अणुऊर्जेवर चालणारे, ते इंधन न भरता दीर्घकाळ समुद्रात राहू शकते, ज्यामुळे अमेरिकन नौदलाला एक धोरणात्मक फायदा मिळतो. विश्लेषकांचे मत आहे की ही तैनाती या प्रदेशात अमेरिकेची उपस्थिती मजबूत करण्यासाठी आणि संभाव्य धोक्यांना संदेश देण्यासाठी आहे.






