आज दुपारी ३.२० ला सुरु होणारं ग्रहण संध्याकाळी ६.०० पर्यंत पाहायला मिळणार आहे. मात्र ज्योतिषशास्त्राच्या मते, ग्रहण जरी दुपारी सुरु झालेलं असलं तरी, सुतककाळ सकाळी ६ वाजल्यापासून सुरु झाला आहे. हा सूतककाळ ग्रहणसमाप्तीपर्यंत असणार आहे.
काय करु नये
ग्रहण काळात कोणतंही काम करु नये असं स्कंदपुराणात सांगण्यात आलेलं आहे. जसं की, जेवण करणं, झोपणं, अन्न शिजवणं हे वर्ज्य मानलंं आहे. त्याचबरोबर ग्रहणकाळात देवदेवतांना स्पर्श करु नये असं देखील सांगितलं जातं.
या ग्रहण काळात चंद्राचा रंग लालसर असणार आहे. खास करुन भारताताच्या ईशान्यकडील शहरात हे अधिक स्पष्टपणे पाहायला मिळेल. तर पश्चिम आणि दक्षिण भारतात ग्रहणाचा फक्त शेवटचा भागच दिसेल. त्यामुळे त्या भागात ‘ब्लड मून’ स्पष्टपणे दिसण्याची शक्यता फार कमी आहे.
काय काळजी घ्यावी ?
असं म्हटलं जातं की, ग्रहण काळात वातावरण दुषित होतं त्यामुळे शक्यतो घराबाहेर पडणं टाळावं. ग्रहणाच्या वेळी मंत्रजप करणे खूप शुभ मानलं जातं. या काळात महामृत्युंजय मंत्र आणि चंद्र मंत्र “ॐ श्रीं श्रीं श्रौं सः चंद्रमसे नमः” या मंत्राचा जप करणं शुभ फलदायी आहे. त्याचबरोबर आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण करावं. ग्रहण काळात घरातल्या देवतांना पिवळ्या कपड्यात झाकून ठेवावं असं अध्यात्म सांगतं. ग्रहणकाळ संपतात पहिले अंघोळ करावी आणि घरात गंगाजल शिंपडावं. याला वैज्ञानिक कारण देखील तसंच आहे. ग्रहण काळात बाहेरील वातावरण दुषित असतं. त्यामुळे श्वसनाला त्रास होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येते.
यंदाचं हे ग्रहण मुंबईसह इतर शहरात देखील दिसणार असल्याने खगोल प्रेमींसाठी ही पर्वणीच आहे. पाहा कुठे आणि कसं दिसणार चंद्रग्रहण ?
पुणे, मुंबईसह राज्यातील ३५ जिल्ह्यातील चंद्रग्रहण किती वेळ असणार आहे?
याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया…
अहिल्यानगर :संध्याकाळी 6.37 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
अकोला : संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
अमरावती : संध्याकाळी 6.24 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
छत्रपती संभाजीनगर : संध्याकाळी 6.34 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
बीड : संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
भंडारा : संध्याकाळी 6.16 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
बुलडाणा : संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
चंद्रपूर : संध्याकाळी 6.18 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
धुळे :संध्याकाळी 6.36 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
गडचिरोली : संध्याकाळी 6.15 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
गोंदिया : संध्याकाळी 6.13 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
हिंगोली : संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
जळगाव : संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
जालना : संध्याकाळी 6.32 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
कोल्हापूर : संध्याकाळी 6.40 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
लातूर : संध्याकाळी 6.30 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
मुंबई : संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
नागपूर: संध्याकाळी 6.18 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
नांदेड : संध्याकाळी 6.26 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
नाशिक : संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
धाराशिव : संध्याकाळी 6.32 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
पालघर : संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
परभणी : संध्याकाळी 6.29 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
पुणे : संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
रायगड : संध्याकाळी 6.45 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
रत्नागिरी : संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
सांगली : संध्याकाळी 6.39 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
सातारा : संध्याकाळी 6.41 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
सिंधुदुर्ग : संध्याकाळी 6.43 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
सोलापूर : संध्याकाळी 6.33 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
ठाणे : संध्याकाळी 6.44 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
वर्धा : संध्याकाळी 6.20 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
वाशिम : संध्याकाळी 6.27 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
यवतमाळ : संध्याकाळी 6.22 वाजेपासून ते 6.47 वाजेपर्यंत असेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)






