लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) तिसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे. एनडीए आघाडीने 292 जागा जिंकल्या आहेत. मात्र, एकट्या भाजपला बहुमताचा आकडा (272) गाठता आला नाही आणि केवळ 240 जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी भारत ब्लॉकने 234 जागा जिंकल्या आहेत. असे असताना लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार स्थापनेची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी सायंकाळी सहा वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेतील. सध्या एनडीएची संसदीय मंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली असून यावेळी घटकपक्षातील सर्व पक्ष उपस्थित आहेत. यावेळी महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या मंत्र्यांचाही समावेश आहे. या बैठकीत पुढची दहा वर्ष सत्ता कायम ठेवणार, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीदरम्यान केले आहे.
नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड करण्यासाठी आज एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक होत आहे. या बैठकीत मोदींची NDA संसदीय पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात आली असून, TDP अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि JDU प्रमुख नितीश कुमार यांसारखे आघाडीचे वरिष्ठ भागीदार अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या खासदारांची यादी सादर करतील. पंतप्रधानपदाची नरेंद्र मोदी शपथ घेणार आहेत. एनडीएकडे 293 खासदार आहेत, जे 543 सदस्यांच्या लोकसभेतील बहुमताच्या 272 पेक्षा जास्त आहे. आज पक्षाच्या मुख्यालयात भाजपच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत भाषण केले. त्यांनी नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विजयी होऊन आलेले सर्वजन अभिनंदनास पात्र आहेत. मी संसदेच्या सेन्ट्रल हॉलमधून मी त्यांचे आभार मानतो. एनडीएचा नेता म्हणून माझी तुम्ही सर्वसंमतीने निवड केली. या निवडीमुळे मला नवी जबाबदारी मिळाली आहे.
“तुम्ही मला पुन्हा एकदा नेता म्हणून निवडून दिले आहे. म्हणजेच तुमच्यात आमाझ्यात विश्वासाचं नातं आहे. भारतासारख्या महान देशाची ताकद पहा. आज देशात एनडीएची २२ राज्य सरकारे आहेत. लोकांनी 22 राज्यांमध्ये NDLA ची सेवा देण्याचे मान्य केले. तुमची एनडीए आघाडी हा देशाचा खरा आत्मा आहे. तुमची एकता हे भारताचे प्रतिबिंब आहे. तसेच मी पूर्ण जबाबदारीने हे बोलत आहे. एनडीए सरकार आगामी 10 वर्षांत सुशासन, विकास, नागरिकांचा जीवनस्तर उचावणे यावर काम करणार आहे. मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग यांच्या जीवनात सरकार जेवढं कमी हस्तक्षेप करेल तेवढ्याच प्रमाणात लोकशाही सशक्त होत असते. आम्ही विकासाचा नवा अध्याय लिहू. जनतेच्या समावेशाचा नवा अध्याय लिहू. सर्वजण मिळून आपण भारताचे विकसित भारताचे स्वप्न साकार करू. संसदेत कोणत्याही पक्षाचा कोणताही लोकप्रतिनी असो माझ्यासाठी सर्वजन समान असतील. आमच्यासाठी सर्वजन समान आहे. याच कारणामुळे गेल्या तीस वर्षांपासून एनडीए सरकार मजबुतीने पुढे जात आहे, असं नरेंद्र मोदी यांनी भाषणात म्हटलं आहे.