केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये १४ फेब्रुवारी २०१९ रोजी, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याने जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील, लेथापोरा अवंतीपोराजवळ सैनिकांना घेऊन जाणाऱ्या एका ताफ्यावर आत्मघाती हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद (CRPF soldiers) झाले. आदिल अहमद डार उर्फ आदिल अहमद गादी टेकरनवाला उर्फ वकास कमांडो असे त्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव होते. आज या पुलवामा हल्ल्याला ३ वर्ष पूर्ण झाली (Three Years Of Pulwama Attack) आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण (Tribute To Martyrs Of Pulwama Attack) केली आहे.
नितीन गडकरींनी कु वर पोस्ट करत म्हणाले की, १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे CRPF जवानांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व शूर जवानांना विनम्र श्रद्धांजली आणि अभिवादन. त्यांचे बलिदान देश विसरणार नाही.
सुप्रिया सुळेंकडून श्रद्धांजली
डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून श्रद्धांजली
महादेव जानकर यांची श्रद्धांजली