File Photo : Narendra Modi
नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीत भाजप असो वा काँग्रेस कोणत्याही पक्षाला स्पष्ट असे बहुमत मिळाले नाही. त्यामुळे भाजपने आपल्या मित्रपक्षांच्या मदतीने देशात सरकार स्थापन केले आहे. त्यानुसार, देशात भाजपप्रणित सरकार सत्तेवर आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील दोन टर्ममध्ये जे झालं नाही ते या टर्ममध्ये होणार आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीए सरकारचे लोकसभेचे हे पहिले अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. लोकसभेच्या कामकाजाला सकाळी सुरुवातही झाली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी खासदार म्हणून शपथ घेतली. यासाठी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्त झालेले भर्तृहरी महताब यांनी त्यांना शपथ दिली. पण हे सरकार स्थापन झाले असले तरी आता या सरकारमध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद लोकसभेत दिसणार आहे.
यापूर्वी मोदी सरकारच्या दोन टर्ममध्ये लोकसभेत विरोधी पक्षनेते हे पद अधिकृतरित्या नव्हते. त्यामुळे विरोधी पक्ष असला तरी त्याला सरकारच्या निर्णयात विचारणा केली जात नव्हती. मात्र, आता हे पद यंदाच्या लोकसभेत असणार आहे.
काय सांगतो नियम?