अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या मेहुण्याचा अपघातात मृत्यू; बहिण गंभीर

प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या कुटुंबात एक मोठी दु:खद घटना घडली. पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पतीचा भीषण अपघातात (Pankaj Tripathi Brother in Law Died) मृत्यू झाला तर त्यांची बहिण यामध्ये गंभीर जखमी झाली.

    धनबाद : प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या कुटुंबात एक मोठी दु:खद घटना घडली. पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पतीचा भीषण अपघातात (Pankaj Tripathi Brother in Law Died) मृत्यू झाला तर त्यांची बहिण यामध्ये गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात झारखंडच्या धनबादच्या निरसा (Accident in Nirasa) येथे झाल्याची माहिती दिली जात आहे.

    राजेश तिवारी उर्फ मुन्ना तिवारी असे अपघातात मृत्यू झालेल्या त्रिपाठी यांच्या मेहुण्याचे नाव आहे. राजेश तिवारी हेच कार चालवत होते. तर बहीण सविता तिवारी या कारमध्ये बसलेल्या होत्या. धनबाद शहरात त्यांचा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोघांनाही तातडीने धनबाद येथील एसएनएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, राजेश तिवारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्यांची बहीण सरिता यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

    भरधाव कार दुभाजकावर धडकली

    राजेश तिवारी यांची भरधाव कार धनबाद शहरातून जात होती. त्यावेळी ही कार दुभाजकावर जाऊन धडकल्याची माहिती मिळाली आहे. राजेश तिवारी आणि त्यांची पत्नी हे दोघेही गोपालगंजहून कोलकात्याला जात असताना हा अपघात झाला. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान राजेश तिवारी यांचा मृत्यू झाला. तर बहिण सविता तिवारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.