संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून विरोधकांनी बजेटकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचे सांगितले आहे (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले आहे. पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाले आहे. अर्थसंकल्प अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस नेत्यांनी सत्ताधारी खासदार आणि अर्थसंकल्पाच्या विरोधात भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होताच, काँग्रेस नेते उदित राज यांनी उत्पादन, जीडीपी आणि देशांतर्गत वापरात घट झाल्याचे कारण देत आर्थिक परिस्थितीवरुन सत्ताधारी भाजपवर टीका केली. तसेच देशाच्या या अर्थसंकल्पाकडून कोणत्याही अपेक्षा नसल्याचे देखील उदित राज म्हणाले आहेत.
कॉंग्रेस नेते उदित राज म्हणाले की, “देशातील उत्पादन घटले असल्याने कोणतीही आशा नाही. जीडीपीमध्येही घट झाली आहे. आर्थिक अहवालांमध्ये दिलेला डेटा किती विश्वासार्ह आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. देशांतर्गत वापरही वाढलेला नाही आणि कर वाढत आहेत. या अर्थसंकल्पातून कोणतीही आशा नाही अशी भूमिका कॉंग्रेस नेते उदित राज यांनी व्यक्त केली आहे. तर काँग्रेस खासदार माणिकम टागोर म्हणाले की, “आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताची अर्थव्यवस्था आता एका वेगळ्या टप्प्यात आहे. रोजगारांची संख्या कमी होत आहे. मध्यमवर्गीयांना त्रास होत असताना अतिश्रीमंतांना प्रचंड पैसा मिळत आहे. आम्हाला आशा आहे की सरकार आपले धोरण बदलेल आणि लोकांच्या वेदना कमी करेल, खासदार माणिकम टागोर म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पाकडून कोणतीही अपेक्षा नसल्याचे सांगितले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “आज राष्ट्रपतींचे अभिभाषण आहे. उद्या बजेट येईल. सत्राचा हा पहिला भाग खूप कमी दिवसांचा आहे. आपण सर्व विरोधी पक्षांचे सदस्य, पुढील सत्रांमध्ये अर्थसंकल्पावर चर्चा करू. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करून सुरू होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत सोनिया गांधी यांनी केलेले वक्तव्य देखील चर्चेत आले आहे. मीडियाचे कॅमेरे सुरु असल्यामुळे ते रेकॉर्ड झाले आहे. संसदेच्या कामकाजानंतर, संसदेच्या बाहेर राहुल गांधी आणि सोनिया गांधी आपापसात बोलत होते. राहूल गांधी यांनी सोनिया गांधी यांना, राष्ट्रपतींचे भाषण कंटाळवाणे वाटले,राष्ट्रपती फक्त जुन्या गोष्टी पुन्हा सांगत आहेत. अशी म्हटलं. त्यावर सोनिया म्हणाल्या की, “राष्ट्रपती खूप थकलेल्या दिसल्या. त्या मोठ्या मोठ्या कष्टाने बोलत होत्या, बिचाऱ्या.” अशी प्रतिक्रिया दिली. पण त्याचवेळी मीडिया कर्मचाऱ्यांचा कॅमेरा आणि माइक चालू होता, ज्यामुळे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड झाला.